आयुष भारत अंबाजोगाई तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

बीड (बारामती झटका)

आयुष भारत अंबाजोगाई तालुका अध्यक्ष पदी डॉ. साबीर शेख यांची निवड तर डॉ. पंडित अडसूळ यांची अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष पदी तसेच डॉ. आयुबखान पठाण यांची अंबाजोगाई तालुका सचिव पदी निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आमीर मुलाणी यांनी दिली. ही निवड डॉ. जलील शेख, डॉ. फैयाज शेख, डॉ. रसूलखान पठाण, डॉ. विश्वास वाघमारे, डॉ. भोसले, डॉ. इनामदार, डॉ. नामदेव मोरे, डॉ. अमीर पठाण, डॉ. किशोर बोकील, डॉ. स्वाती राजे, डॉ. सुहास शेवाळे, डॉ. विश्वास फपाळे, डॉ. सिता भिडे, डॉ. प्रविण निचात, डॉ. गायत्री हाजारे, डॉ. फिरोज पठाण, डॉ. शब्बीर पठाण, डॉ. सोमनाथ बोराटे व राष्ट्रीय नियोजन समितीचे सर्व अध्यक्ष व आदी मान्यवर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे.

आयुष भारत संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारी देशातील सर्वात मोठी आयुष भारत संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे. आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे.

तसेच डॉक्टरांच्या समस्या, डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत अंबाजोगाई तालुका अध्यक्ष डॉ. साबीर शेख यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपिलीव गावात एमएसएमबी लाईटच्या मीटरचे ग्राहक कोमात तर, आकडेवाले नागरिक जोमात.
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत मातंग चर्मकार रामोशी वडार समाज का सहभागी होत नाही – बी. टी. शिवशरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here