मुंबई ( बारामती झटका )
महाविकास आघाडी सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचा सन्मान माळशिरस पंचायत समितीच्यावतीने माजी उपसभापती युवानेते किशोरभैय्या सुळ पाटील यांनी विशेष सन्मान केला. माळशिरस तालुक्यामध्ये कोरोना विषारी विषाणू संसर्ग रोगाने थैमान घातलेले होते. माळशिरस तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली होती. अशा कठीण परिस्थितीत माळशिरस पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांचे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. कोरोना लसीकरण करणे गरजेचे होते, अशावेळी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला कोरोना लस जास्तीत जास्त उपलब्ध करून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लसीकरण माळशिरस तालुक्यामध्ये झालेले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी महालसीकरण जिल्ह्यामध्ये राबवलेले होते. त्या वेळेस माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी लसीकरण मोहीम उत्कृष्ट प्रकारे राबून जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण माळशिरस तालुक्याचे झाले होते. माळशिरस तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्याचीही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी महाळुंग व माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन केलेले आहे. या सर्व लसीकरण व ऑक्सीजन प्लांट यासाठी डॉ. राजेश टोपे यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या तमाम जनतेच्यावतीने माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवानेते किशोरभैया सूळ पाटील यांनी डॉ. राजेश टोपे यांचा विशेष सन्मान केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng