मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेवून दत्तक घेतले…
माळशिरस (बारामती झटका)
मराठा समाजासाठी अहोरात्र लढणारे शिवक्रांती सेनेचे संस्थापक स्व. संजय सावंत यांचे दुःखद निधन झाल्यामुळे संजय सावंत यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. ते बघून मराठा समाजभूषण आरोग्य कुटुंब कल्याणमंत्री तानाजीराव सावंत यांनी स्व. संजय सावंत यांच्या पत्नी अर्चना संजय सावंत यांना तीन लाख रोख रक्कम दिली व मुलाचे शिक्षण व नोकरीची जबाबदारी व मुलीचे शिक्षण व मुलीच्या लग्नाची ही जबाबदारी स्वीकारून दत्तक घेतले आहे.
आज दि. ७/३/२०२३ रोजी सदरील कुटुंबास मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेशभैय्या डोंगरे पाटील यांच्या माध्यमातून 3 लाख रुपये रोख रक्कम त्यांच्या पत्नी व मुलांच्या हातात मदत म्हणून दिली. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिकराव खंडे, बीड मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर नाना काळकुटे, अशोकराव हिंगे, शंकर कापसे, सुनील बोडके, सोमनाथ मगर, अनिल साळुंखे, सुभाष जाधव सर, भारत काळे, बळवंत कदम, नाना माशेरे, भाऊ मोरे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng