आर्य वैश्य महासभा व युवा ग्रुपच्या वतीने गरजूंना दिवाळी वस्तूंची भेट

पंढरपूर (बारामती झटका रुपेश संत यांजकडून)

आर्य वैश्य महासभा व युवा ग्रुप कोमटी समाजाच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम, माऊली बेघर निवारा केंद्र व लिंक रोड येथील रामकृष्णहरी वृद्धाश्रम येथील गरजूंना दिवाळी वस्तूंची भेट देण्यात आली.
पंढरपूर शहरातील कोमटी समाजातील युवकांनी एकत्र येऊन युवा ग्रुपची स्थापना केली आहे.या ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम केले जातात. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजूंना आवश्यक मदतीचे वाटप, गुणवंतांचा सन्मान असे विविध उपक्रम युवा ग्रुपच्या वतीने नियमितपणे केले जातात.
यावर्षी वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्ती व बेघर असणाऱ्या गरजू व्यक्तींना युवा ग्रुप व आर्य वैश्य महासभेच्या वतीने दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या साबण, तेल व उटणे या वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री संजय उर्फ बाळासाहेब कौलवार, सचिव डॉ. सचिन लादे, उपाध्यक्ष राजेंद्र वट्टमवार, कार्याध्यक्ष शिरीष पारसवार, कोषाध्यक्ष अविनाश नलबिलवार, कार्यकारणी सदस्य राजू पल्लेवार, युवा ग्रुपचे कार्यकर्ते व्यंकटेश ऊर्फ राजू कौलवार, अमित गडम, विठ्ठल कटकमवार, अभिषेक सातारकर, राघवेंद्र गौरवार, रॉबिन हूड आर्मीचे प्रसाद कोत्तूर, दीपक सगर, माऊली बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक संतोष कसबे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मातोश्री वृद्धाश्रम येथील पुरुष वृद्धांना महासभेचे कार्याध्यक्ष शिरीष पारसवार यांच्यावतीने कपड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यासाठी पंढरपुरातील समाजबांधवांनी सहकार्य केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रताप क्रीडा मंडळाचा दिपवाळी निमित्त सर्वसामान्य जनतेसाठी स्तुत्य उपक्रम.
Next articleलोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी माळशिरसच्या मुस्लिम समाज बांधवांची अडचण दूर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here