वेळापूर गट नंबर 1059 मधील संपादित क्षेत्रास तत्कालीन प्रांताधिकारी शमा पवार यांनी 30, लाख 82, हजार 984/- रु रकमेची नोटीस तर डॉ. विजय देशमुख यांनी 2. कोटी 85 लाख 21 हजार 811/-रुपयाचे वाटप.
सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी संगनमताने अपहार केला
वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाणार – दीपक उत्तमराव माने देशमुख
वेळापूर ( बारामती झटका )
आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वेळापूर ता. माळशिरस येथील गट नंबर 1059 मधील क्षेत्र महामार्ग 965- ग संपादित झालेल्या क्षेत्राची चौकशी करावी, तत्कालीन भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी शमा पवार यांनी संपूर्ण चौकशी करून सदर गटातील नुकसान भरपाई 574 चौरस मीटर संपादनाची 30 लाख 82 हजार 984 रुपयाची नोटीस दि. 10/5/2021 रोजी देण्यात आली होती मात्र सक्षम प्राधिकरण भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी 2 कोटी 85 लाख 21 हजार 811 इतक्या रकमेचे श्री चंद्रकांत गणपत माने व दत्तू गणपत माने यांना वाटप केलेले असल्याने श्री दीपक उत्तमराव माने देशमुख यांनी जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलेले आहे. जर चौकशी झाली नाही तर उच्च न्यायालयात जाणार असल्याचे दीपक माने देशमुख यांनी सांगितले. यावेळी संतोष बाळकृष्ण माने देशमुख, बाबुराव हनुमंत माने देशमुख उपस्थित होते.

तक्रारदार दीपक उत्तमराव माने देशमुख यांनी तक्रारी अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला होता. त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती उपलब्ध केलेली होती. सदर माहितीच्या आधारे सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी यांनी 27/02/2021 रोजी पहिली नोटीस दिली होती. यानुसार चंद्रकांत गणपत माने व दत्तू गणपत माने यांचे नावे गट क्रमांक 1059 मधील 4925 चौरस मीटर क्षेत्र संपादनाची दिली होती. त्याअन्वये 2 कोटी 85 लाख 21हजार 811 रुपये रकमेची नोटीस दिली होती. त्यावेळी 17/12/2021 रोजी भूसंपादन अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली होती. त्या अनुषंगाने भूसंपादनमध्ये जुना गट नकाशा नवीन गाव नकाशा भूसंपादन नकाशा फाळणी नकाशा यामध्ये तफावत असल्याने तत्कालीन सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा प्रांताधिकारी शमा पवार यांनी संपूर्ण चौकशी करून दि. 27/02/2021 रोजी देण्यात आलेली 49 25 चौरस मीटर क्षेत्राच्या संपादनाच्या नुकसान भरपाई रद्द करून सदर गटांमधील 574 चौरस मीटर संपादनाची नोटीस रक्कम 30 लाख 82 हजार 984 ची दिनांक 10/5/2 21 रोजी देण्यात आली. सदर प्रकरणात मी स्वतः नुकसानग्रस्त असल्याबाबतची तक्रार 10/6/ 20 21 रोजी तक्रारी अर्ज दिलेला होता यावर आजतागायत चौकशी झालेली नाही.
तत्कालीन प्राधिकारी भूसंपादन तथा प्रांताधिकारी यांनी अतिरिक्त नुकसान भरपाई रद्द केलेली असताना हे सर्व माहित असताना सुद्धा प्राधिकारी भूसंपादन कथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी रद्द झालेल्या दिनांक 27/02/2021 च्या नोटीसी च्या आधारे श्री. चंद्रकांत गणपत माने व दत्तू गणपत माने यांना दोन कोटी 85 लाख एकवीस हजार 811 इतक्या रकमेचे वाटप केले असल्याचे माहिती अधिकार अन्वये समजलेले आहे. कार्यालयाकडून प्राप्त झालेली दिनांक 3/12/2021 रोजी ची माहिती मिळाल्यानंतर सदर माहितीचे अवलोकन केले असता सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी दिनांक 27/02/2021 च्या नोटिशी नुसार विना तारखेच्या सीसी फार्म, कब्जे पावत्या तसेच विना तारखेच्या जबाबाच्या प्रती देण्यात आलेले आहेत.
दीपक माने देशमुख यांनी धक्कादायक प्रकार सांगितला श्री चंद्रकांत गणपत माने हे साधारण तीन ते चार वर्षापूर्वी झालेल्या अपघातात घरी झोपून आहेत. त्यांचा दुसरा ग्ट क्रमांक 1061/ 2 या गटांमधील नुकसान भरपाई घेतलेली आहे. त्यामध्ये नुकसान भरपाई घेताना त्यांनी सीसी फार्मवर अंगठे दिलेले आहेत परंतु, या प्रकरणांमध्ये त्यांची सही करण्यात आलेली आहे, असा धक्कादायक प्रकार आहे. यावरून असे सिद्ध होते की, सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी संगनमताने सदर रकमेचा अपहार केला आहे. शासनाची व अर्जदाराची फसवणूक केलेली आहे. सदर प्रकरणाची चौकशी आपल्या स्तरावरून करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी असा अर्ज जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आहे. जर यांच्याकडून न्याय नाही मिळाला तर कागदपत्राच्या आधारे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे तक्रारदार दीपक उत्तमराव माने देशमुख यांनी सांगितले.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर आमच्या जमिनी एका बाजूला आहेत सर्वांचे क्षेत्र चार पाच सहा गुंठे असे भुसंपादन झालेली आहेत. असे असताना चंद्रकांत माने व दत्तू माने यांचे क्षेत्र भू संपादित करून उरलेले क्षेत्र रस्त्याच्या एका बाजूला मोजलेले असतानासुद्धा त्यांना तत्कालीन प्रांताधिकारी शमा पवार यांनी भूसंपादन केलेली रक्कम देणे गरजेचे असताना वाढीव रक्कम प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी संगणमत करून दिलेली आहे. सदर तक्रारी अर्जासोबत दि. 27/02/2021 रोजीची नोटीस, दि. 10/06/2021 रोजीचा तक्रारी अर्ज, दि. 10/05/2021 रोजी ची फेर नोटीस, दि. 03/12/2021 रोजीचा माहिती अधिकार अर्ज, जुना गट नकाशा, नवीन गाव नकाशा, भूसंपादन नकाशा, फाळणी नकाशा, दि. 03/12/2021 रोजी च्या अर्जास प्राप्त झालेली माहिती, सी.सी.फाॅर्म, कब्जे पट्टी, जवाब इत्यादी कागदपत्रे जोडलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng