हेलिकॉप्टर हृदय विकाराच्या मुलीस मुंबईच्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी गेले
सोलापूर ( बारामती झटका )
आज दि. 13 मार्च 2022 रोजी तुकाराम दासी, रा. सुनिल नगर, एम. आय. डी. सी. सोलापूर येथील रहिवासी असून त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भेटून त्यांची लहान मुलगी कु. उंजल तुकाराम दासी (वय 4 वर्षे) हिला हृदय विकाराचा आजार असून तात्काळ शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असून शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी नाना पटोले यांना कु. उंजल दासी हिला उपचारासाठी पाठविण्याकरीता स्वतःचे हेलिकॉप्टर देण्याची विनंती केली. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर कु. उंजल तुकाराम दासी हिला मुंबई येथे हृदय विकाराच्या उपचाराकरीता पाठविले व स्वतः रेल्वेने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng