आ. बबनदादा शिंदे वाटलं नव्हतं तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे याल…

शिर्डी येथे राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर असताना सहा वेळा राष्ट्रवादीचे आमदार असणारे बबनदादा शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे आत्मचिंतन करण्याकरता आले.

पंढरपूर ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी पूजेसाठी आलेले होते. त्यावेळेस माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. बबनदादा शिंदे देवेंद्रजी फडवणीस यांच्या भेटीला आलेले असल्याने लावणी महोत्सवातील सुप्रसिद्ध लावणी ‘राया वाटलं नव्हतं तुम्ही याल’ या लावणीची आठवण आलेली आहे.

आ. बबनदादा शिंदे वाटलं नव्हतं तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे याल कारण, शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर असताना सहा वेळा आमदार असलेले सध्या राष्ट्रवादीचे आमदार असणारे बबनदादा शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे आत्मचिंतन करण्याकरता आले की काय, असा राजकीय वर्तुळामध्ये सवाल उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेक आमदार व नेते भाजपमध्ये ईडीच्या भीतीने गेलेले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीतील भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री व आमदार जाहीर भाषणांमध्ये सांगतात, आत्ता आम्हाला चांगली झोप लागते. काही दिवसांपूर्वी आ. बबनदादा शिंदे यांना ईडीची नोटीस आल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालेली होती. त्यामुळे इडी शहाणी झालेली होती. आज देवेंद्रजी फडवणीस यांच्या भेटीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आलेले असल्याने लवकरच भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत देण्याकरता आलेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्यासोबत महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी मंत्री व आमदार उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांचा सन्मान संपन्न
Next articleमंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी राज्याच्या निधीची मंजुरी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here