सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विधान परिषदेचे आमदार सर्व सामान्य जनतेचे आधारस्तंभ, युवकांचे प्रेरणास्थान युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन बुधवार दि. 4/5/2022 रोजी सकाळी साडेआठ वाजता सदाशिवनगर येथील शिवामृत भवन येथे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवामृत दूध संस्थेचे चेअरमन संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांची राहणार आहे.
विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह येळी्व, जाधववाडी, पुरंदावडे, सदाशिवनगर, मांडवे ग्रामपंचायत ग्रामस्थ, तामशिदवाडी, सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ आणि जिव्हाळा फाऊंडेशन सदाशिवनगर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng