आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनी सतिशतात्या ढेकळेंनी केली पाण्याची सोय

सलग दोन वर्षे २ बोअर होल देऊन सामाजिक बांधिलकी जपत जन्मदिनाच्या दिल्या शुभेच्छा

एकशिव (बारामती झटका)

एकशिव गावचे युवा उद्योजक श्री. सतिशतात्या ढेकळे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते व विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एकशिव येथे गेल्या वर्षीपासून दि. ५ मे चे औचित्य साधून उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेता व पाण्याची टंचाई यांचा विचार करून आणि रणजितदादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन वर्षांपासून व समाज बांधिलकी जपत गेल्या वर्षी १ व या वर्षी १ असे २ बोरिंग होल देऊन नागरिकांना पाण्याची सोय करून देऊन समाजबांधीलकी जपत शुभेच्छा दिल्या. सतिशतात्यांनी आजपर्यत राजकारणाव्यतिरिक्त फक्त गोरगरीब सामान्य जनतेच्या हितासाठी व कोरोना कालावधीमध्ये एकशिव येथील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे. अशा गोर गरीब सामान्य कुटुंबांना किराणा किट व दवाखाण्यासाठी शक्य तेवढी मदत तात्यांनी केली. तसेच प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये आनंदाने व निस्वार्थीपणे सहभागी होऊन अनेक सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत असतात. कोरोना कालावधीत व आतासुद्धा सर्व सामान्य जनतेला एक आधार म्हणून सावलीप्रमाणे उभे राहणारे एकशिवमधील युवा उद्योजक श्री. सतिशतात्या ढेकळे साहेब यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्याचप्रमाणे गेल्यावर्षीपासून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वेळी १ होल व यावर्षी १ बोअरिंग होल घेतले. त्यावेळी मशीन पुजन माळशिरस पंचायत समितीचे मा. उपसभापती युवा नेते श्री. अर्जूनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी एकशिवचे प्रथम नागरिक सरपंच श्री. शहाजीदादा धायगुडे, उपसरपंच भारत साळवे, सभापती सुग्रीव मोटे, मा. सरपंच रामभाऊ बागणवर, मा. उपसरपंच गुणवंत पाटील, उद्योजक प्रविण पांढरकर, ग्रा. सदस्य राहुल अवघडे, मा. ग्रा. सदस्य किसन रुपणवर, मा. ग्रा. सदस्य अय्याज मुलाणी, भीमराव जाधव, संजय जगताप, हमीद मुलाणी, प्रहारचे संभाजी गावडे, तात्यासाहेब गावडे, चंद्रकांत माने, बाळासाहेब खंडागळे, शंकर जाधव, तोषिफ मुलाणी आदी उपस्थित होते.

यावेळी उद्योजक श्री. सतिशतात्या ढेकळे साहेब यांचा श्री. अर्जूनसिंह मोहिते पाटील यांनी सत्कार केला व यापुढे समाजसेवा करण्यासाठी कोणतीही मदत लागल्यास आम्ही सहकार्य करू, असेही अर्जुनदादांनी सांगितले. त्यावेळी घेतलेल्या होल ला चांगल्या पद्धतीचे पिण्यायोग्य पाणी लागले. त्यामुळे सर्व नागरिक व ग्रामस्थ यामध्ये आनंदाचे वातावरण झाले. या स्तुत्य उपक्रमामुळे सतिशतात्यांचे सर्वच स्तरातून खूप कौतुक केले जात आहे. यावेळी सर्व आजी माजी सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व एकशिव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभाजपचे मोहिते पाटील गटाचे सयाजीराजे विकास सेवा संस्थेला फक्त नावंच राहिले, एकहाती सत्ता गेली राष्ट्रवादीच्या ताब्यात.
Next articleमाळशिरस तालुक्यातील पाच गावात सात ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here