आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे माळशिरस तालुक्यात २५१ कोटींचे “जलजीवन”

फोंडशिरससाठी १७ कोटी ८३ लक्ष रूपयांची पाणीपुरवठा योजनेस मंजूरी

अकलूज (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस व वाडी-वस्त्यांकरीता भविष्यकालीन पुढील ३० वर्षांचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत १७ कोटी ८३ लक्ष रूपयांच्या योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजूरी मिळाली असल्याची माहीती आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील प्रत्येकाच्या घरात दरात नळ कनेक्शनद्वारे फिल्टर केलेले पिण्यायोग्य पाणी पोहचावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल २५१ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना आणलेल्या असून आ. मोहिते पाटील यांनी खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी जलजीवन मिशनच राबवत असल्याचे म्हणावे लागेल

उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आ.मोहिते-पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या पाणी पुरवठा योजना

१) निमगाव(म)३३ कोटी रूपये
२) बोरगाव माळेवाडी 13 कोटी रूपये
३) फोंडशिरस १७ कोटी ८३ लक्ष रूपये
४) वेळापूर ७२ कोटीं( तत्त्वतः मान्यता)
५) संग्रामनगर ४९कोटी ०८ लक्ष रूपये
६) यशवंतनगर ६६ कोटी ६७ लक्ष रूपये


उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी पातळी व पाण्याची उपलब्धतेच्या कमतरतेमुळे फोंडशिरस वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने फोंडशिरस येथील तलावात बुडीत क्षेत्रात नवीन विहीर घेऊन त्यातून पंपाद्वारे पाणी उचलून तलावापासून ४ किलोमीटर अंतरावरील बाणलिंग मंदिरासमोर नूतन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्राजवळच जुन्या टाकी शेजारीच नवीन २,२०,००० लिटर तसेच मोटेवाडी येथे १,५८,००० लिटर व बोराटे मळा येथे ८२,००० लिटर क्षमता असणाऱ्या नवीन तीन टाक्या बांधण्यात येणार असून या नवीन टाक्यामधून फोंडशिरस व वाड्या-वस्त्याकरीता नळ कनेक्शनद्वारे पिण्याच्या पाण्याचे वितरण होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता ५ वी आणि ८ वीचा निकाल जाहीर – गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे
Next articleGriffins Waves And initiate restaurantes en palamos Grass Eating place Stuart, Sarasota

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here