युवा नगरसेवक दीपकआबा काळे यांच्या माध्यमातून वडार समाजाचे प्रश्न मार्गी लावू – लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते.
नातेपुते ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी नातेपुते नगरपंचायतीचे युवा नगरसेवक दीपकआबा काळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, नातेपुते नगरीचे माजी सरपंच व विद्यमान नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, नातेपुते नगरीचे माजी उपसरपंच व विद्यमान नगरसेवक भाजपचे नेते दादासाहेब उराडे, भारतीय जनता पार्टीचे नातेपुते शहराध्यक्ष भैय्यासाहेब चांगण, तालुका चिटणीस संजयमामा उराडे, युवा नेते अमित चांगण, आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे आदी मान्यवरांसह वडार समाज बांधव व काळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा सन्मान वडार समाज बांधव व काळे परिवार यांच्यावतीने युवा नगरसेवक दिपकआबा काळे यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान काळे परिवारांच्या वतीने करण्यात आला. वडार समाज बांधवांनी आपल्या अडीअडचणी आमदार राम सातपुते यांना सांगितल्या. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भविष्यामध्ये आपल्या वडार समाजाच्या अडीअडचणी युवा नगरसेवक दिपकआबा काळे यांच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे आमदार राम सातपुते यांनी उपस्थित वडार समाज व काळे परिवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितले.

आमदार राम सातपुते व उपस्थित मान्यवर यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. आमदार राम सातपुते यांनी दीपकआबा काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्याने नातेपुते पंचक्रोशीतील वडार समाजाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng