आ. राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात, वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही.

सर्वसामान्य जनतेच्या कायम पाठीशी राहणार, काळजी करण्याचे कारण नाही – लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते.

वेळापुर ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात वेळापूर येथे झालेला आहे. आ. राम सातपुते यांची गाडी सर्विसिंगला दिलेली असल्याने ते मित्राची गाडी घेवून कार्यक्रमासाठी निघाले होते. गाडीमधील कोणालाही खरचटलेसुद्धा नाही वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत आ. राम सातपुते यांच्यासह विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे, चालक सर्व सहीसलामत आहेत. काही काळजी करण्याचे कारण नाही.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते मुंबई पुणे येथील कामे आटोपुन आज सकाळी मतदार संघातील लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांना भेटी देऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या टेंभुर्णी येथील कार्यक्रमासाठी जात असताना पुणे पंढरपूर रोडवर वेळापूर येथे अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने चालक यांनी बाजूला घेत असताना डीवाईडरवर गाडी गेली आणि समोरचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी बाजूच्या शेतामध्ये गेलेली आहे. गाडीमधील आमदारासह कोणालाच दुखापत अथवा इजा झालेली नाही. आमदार यांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात वार्‍यासारखी बातमी पसरली. अनेकांचे फोन एकमेकांना खणाणू लागले. आमदार राम सातपुते यांच्याशी संपर्क केला असता जनतेच्या सेवेमुळे अपघात होऊन सुद्धा खरचटले नाही. शंभू महादेवाच्या नगरीमध्ये अपघात झालेला आहे. गाडीचे टायर फक्त फुटलेले आहेत, बाकी काही नाही. माळशिरस तालुक्यातील जनतेने काळजी करण्याचे कारण नाही, आपला आशीर्वाद कायम पाठीशी असल्याने भविष्यात आपली सेवा कायम करणार असल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
Next articleमाळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 5 गावातील 7 जागांसाठी 17 अर्ज दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here