आ. राम सातपुते व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी स्वर्गीय एकनाथ देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय एकनाथ भिकू देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवानेते अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेऊन स्वर्गीय एकनाथ देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्व. एकनाथ देशमुख यांनीअकलूज येथे उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर ६१ फाटा माळशिरस येथे अंत्यसंस्कार करून रक्षाविसर्जन कार्यक्रम झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आमदार राम सातपुते अधिवेशनात व्यस्त असल्याने व माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील बाहेरगावी असल्याने त्यांनी रविवार दि. ५ मार्च २०२३ रोजी देशमुख परिवारांची सांत्वनपर भेट घेतली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने यांचा माळशिरस नगर विकास युवक आघाडीकडून सत्कार
Next articleमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातून कु. प्रदीप गोरड चे यश तर वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मच्छिंद्र गोरड यांना मास्टर ऑफ सर्जन ची पदवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here