इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून लाकडी निंबोडी रेंगाळलेली योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं, राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांची भूमिका योग्य

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या पदाचा आणि लाकडी निंबोडी योजनेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.

माळशिरस ( बारामती झटका )

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून जनतेने निवडून दिलेले आहे. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील जनहितार्थ योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं लोकप्रतिनिधी यांचे कर्तव्य बजावणं हे काम असते. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून लाकडी निंबोडी रेंगाळलेली योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांची भूमिका योग्य आहे. सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री या पदाचा आणि लाकडी निंबोडी योजनेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.

उजनी धरणाचे पाणी पळविण्याचे आरोप होत असताना आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत स्पष्ट भाष्य केले असून सोलापूरकरांनी उजनीच्या पाण्याबाबत वस्तुस्थिती समजावून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

उजनी धरण हे सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले असून उजाड माळरानावर देखील या पाण्याने नंदनवन उभे केले आहे. हरितक्रांती केलेले उजनीचे पाणी अनेकदा संघर्षाची आग देखील ओकत असते आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ओतलेल्या या धरणाचे पाणी अधूनमधून पेटत असते. उजनीच्या पाण्याची पळवापळवी करण्याचे प्रकार आधीपासूनच घडत असल्याचे आरोप आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून इंदापूरला पाणी नेण्याचा होत असलेला प्रयत्न अधिकच चिघळत गेला आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. इंदापूर तालुक्याला उजनीचे पाणी नेण्याचा विषय यापूर्वी देखील पेटला होता आणि लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर शासनाला देखील निर्णय फिरवावा लागला होता. राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने काढावे अशी मागणी देखील होत होती. त्यानंतर आता पुन्हा इंदापूरला उजनीचे पाणी नेण्याचा विषय ऐरणीवर आला आणि सोलापूर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा चिघळू लागले आहे. आ. प्रणिती शिंदे, भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही राष्ट्रवादी आणि पालकमंत्री यांना आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कालच हा विषय झटकला आहे. उजनीच्या कार्यक्षेत्राबाहेर पाणी गेलेले नसून लवादाने ठरवून दिलेल्या हक्काप्रमाणेच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी काल स्पष्ट केल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापूरकरांना पाण्याची वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे. उजनीच्या पाण्याचे पूर्वीच वाटप झाले आहे, उपसा सिंचन योजनेसह अन्य पाण्याचे हे नियोजन असून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजना ही देखील त्याच काळातील आहे. ही योजना रखडली होती परंतु, आता तिला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती असून सोलापूरकरांनी ती लक्षात घ्यावी असे उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यात जाणार हे आता उघड झाले आहे. हे पाणी देण्याचे नियोजन पूर्वीचेच असून ठरल्याप्रमाणे पाणीवाटप होणार असे दिसत आहे.

पालकमंत्री बदल होणार ?
कालपासून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलले जाणार असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु झाली आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती येथे जाऊन शरदचंद्रजी पवार यांची याबाबत भेट घेतलेली होती. तेंव्हापासून या चर्चेला उधाण आलेले आहे. मात्र कोरोना संसर्ग रोगाच्या नियंत्रणासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे योग्य नियोजन करून जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा कार्यकुशल पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना बदणे सर्वसामान्य जनतेच्या विरोधात भूमिका होऊ शकते यामुळे आघाडी सरकार पालकमंत्री बदलाची भुमिका घेतली जाणार नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकार्यसम्राट, डॅशिंग, कार्यतत्पर, लोकप्रिय दमदार आमदाराच्या कार्याची चर्चा होतेय, मग अपघाताची चर्चा तर होणारच.
Next articleनव्वद वर्षीय श्रीमती पार्वतीबाई भोसले यांचा प्रशासनाच्या विरोधात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here