इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
इंदापूर नगरपरिषद इंदापूर यांनी भारत सरकारच्या आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 29 सप्टेंबर रोजी कचरा अलग करो अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमात वर्गीकृत कचरा देणाऱ्या नागरिकांचा सन्मान नगर परिषदेमार्फत करण्यात येणार आहे तसेच घंटागाडी ड्रायव्हर व हेल्पर यांना कचरा विलगीकरण याबाबत प्रशिक्षण व त्यांचाही सन्मान केला जाणार आहे.
दि. 30 सप्टेंबर रोजी सार्वजनिक शौचालय जन भागीदारी अमृतमहोत्सव यानिमित्त सार्वजनिक शौचालय साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान व त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच नागरिकांना व कर्मचाऱ्यांना टॉयलेट बाबत प्रतिक्रिया प्रशिक्षण घेण्यात येणार आहे
दि. 1 ऑक्टोबर रोजी शहा संस्कृतिक भवन येथे शहरातील विविध सामाजिक ,सांस्कृतिक संघटना गणेश मित्र मंडळ ,पत्रकार बांधव व इतर संघटना यांचा नगरपरिषदे वतीने त्यांनी शहराच्या स्वच्छतेमध्ये दिलेल्या योगदानाबाबत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे
दि. 2 ऑक्टोबर रोजी सफाई मित्र अमृत सम्मान समारोह रोजी नगरपरिषदे वतीने स्वच्छता व वृक्षदिंडी शहरात काढण्यात येणार आहे तसेच सर्व सफाई मित्रांना सुरक्षा साहित्य व त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तरी शहरातील नागरिकांनी इंदापूर नगर परिषदे मार्फत राबविण्यात येणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्ष मा.सौ.अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी मा.श्री. रामराजे कापरे यांनी नागरिकांना केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng