इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेची चौकशी करून कारवाई करा, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांची मागणी

२६ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

अकलूज (बारामती झटका)

अकलूज येथील इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनामध्ये अकलूज जुना पंढरपूर नाका येथील इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेतून सर्वसामान्य लोकांची फसवणूक होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याच्या लेखी तक्रारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडे प्राप्त झाल्या असून याची चौकशी करण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे. १२ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते असे सांगून कर्ज घेतल्यानंतर २३ टक्के व्याज दराने कर्जाची वसुली करण्यात येत आहे. हप्त्याच्या तारखेअगोदर तीन चार दिवस हप्ता भरूनही कर्जदारांकडून हप्ता बाउन्स झाल्याचे कारण सांगून हप्त्याचा दंड वसूल केला जातो. बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना बँकेत गेल्यानंतर हप्त्याची माहिती बँकेतील कर्मचारी व्यवस्थित देत नाहीत. कोरोना काळातील थकलेल्या हप्त्यांना व्याज दर लावून कर्जदारांची आर्थिक लूट करण्यात आलेली आहे.

यासह विविध विषयांच्या संदर्भात निवेदन देऊन चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा या मागणीसाठी २६ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूज समोर हालगी नादसह बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदरचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, भारतीय रिझर्व बॅंकेचे चेअरमन, बँकिंग लोकपाल रिझर्व बँक ऑफ इंडिया, जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी अकलूज, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सोलापुर, इक्विटस बँकेचे चेअरमन यांना देण्यात आले आहेत.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, तालुका संघटक पांडुरंग चव्हाण, तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड, अकलूज शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे, अमोल भोसले, युवराज गायकवाड, समाधान गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर विकास सेवा सोसायटीची शंभर टक्के कर्ज वसुली – चेअरमन अमरसिंह माने देशमुख.
Next articleश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील माळशिरस हद्दीत महावितरण कंपनीचे काम अंतिम टप्प्यात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here