चाकोरे (बारामती झटका)
इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड प्यारा स्पर्धेसाठी चाकोरे गावचे सुपुत्र दत्ता वरकड यांची निवड झाली. त्याबद्दल शिवामृत दुग्ध उत्पादन संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
ओडिसा भुवनेश्वर याठिकाणी झालेल्या अथलेटिक्स निवड चाचणी मधून 100 मीटर धावणे व लांब उडी या खेळ प्रकारासाठी झाली होती आणि आता ती स्पर्धा इटली या ठिकाणी दि. २ ते ९ मे २०२२ पर्यंत इटली येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या ॲथलेटिक्स टीममध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेले खेळाडू महाराष्ट्राचे भूषण व मार्गदर्शक प्रशिक्षक श्री. शेखर कुदळे व श्री. सूर्याजी लिंगडे सर यांचे मार्गदर्शनाखाली तयार झाली असून भारताच्या ॲथलेटिक टीमचे कोच श्री. सत्यनारायण सर यांचे मार्गदर्शनाखाली सहभाग घेणार आहेत. त्यासाठी सर्व मार्गदर्शक प्रशिक्षक तसेच चाकोरे गावचे सर्व ग्रामस्थ, मित्रपरिवार सर्वांनी त्यांना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. दरम्यान खेळाडू दत्ता वरकड यांनी सगळ्यांना धन्यवाद दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng