कर्मयोगीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे कारखान्याच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. सभेस कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी हर्षवर्धन पाटील, व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व सर्व विद्यमान संचालक मंडळ उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला कर्मयोगी शंकररावजी पाटील ऊर्फ भाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन हर्षवर्धन पाटील, पद्माताई भोसले, आप्पासाहेब जगदाळे व संचालक मंडळाने केले.
ऑनलाईन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले व सर्व संचालक मंडळाच्यावतीने अहवाल सालातील भारतातील थोर नेते, स्वातंञसेनानी, संशोधक, शास्ञज्ञ, लेखक, साहित्यिक, जवान, कलावंत, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, कारखान्याचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी दिवंगत झाले आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती व कोविड महामारीमुळे मृत्युमूखी पडलेल्या मृतात्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, अधिकारी कर्मचारी व कामगार बंधूभगिनी यांचेवतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
विषयपञिकेनुसार सभेच्या कामकाजास कार्यकारी संचालक यांनी सुरुवात केली व सर्व सभासदांनी ऑनलाईनव्दारे सहभाग घेवून सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. कारखान्याच्या शेअर्स (भागाच्या दर्शनी) मुल्याची किंमत रुपये १०,००० वरुन रुपये १५,००० करण्यास मंजूरी देण्यात येवून वाढीव रुपये ५,००० दोन हप्त्यामध्ये वसूल करण्यास या सभेव्दारे मान्यता देण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे पहिले सहकारमंञी अमित शहा यांनी पुढील पाच वर्षासाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे धोरण ठरविल्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, सर्व सभासद यांच्यावतीने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.
कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. त्यांनी कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधील सर्व विषयांस मान्यता दिल्याबद्दल सर्व सभासदांचे संचालक मंडळाचे वतीने आभार मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेस ऑनलाईन उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार कारखान्याचे संचालक प्रशांत सुर्यवंशी यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng