जिल्हा प्रभारी के. के. पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय देशमुख यांच्या सहकार्यातून इस्लामपूर परिसर भाजपमय करणार. – गणेश पवार.
माळशिरस ( बारामती झटका )
इस्लामपूर ता. माळशिरस येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश ज्ञानेश्वर पवार यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका चिटणीसपदी नियुक्ती भारतीय जनता पार्टी कार्यालय माळशिरस येथे करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या शुभहस्ते नियुक्तीचे पत्रही त्यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा प्रभारी के. के. पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, मिनीनाथ मगर, चन्द्रशेखर रणनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त चिटणीस गणेश पवार यांनी माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा प्रभारी के. के. पाटील व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या सहकार्याने पक्षवाढीसाठी काम करणार असून भविष्यामध्ये इस्लामपूर परिसर भाजपमय करणार असल्याचे सांगून माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितले.
माळशिरस तालुक्यामध्ये दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीच्या संघटक बांधणीमध्ये वाढ होत आहे. अनेक तरुण भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत. इस्लामपूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्यावर युवा मोर्चाच्या चिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. गणेश पवार यांचे तालुक्यामध्ये असणारे संघटन, नेहमी सामाजिक कार्यातील सहभाग, इस्लामपूर पंचक्रोशीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवून मदत करणारे गणेश पवार यांच्या निवडीने भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्य व भारतीय जनता पार्टीची ध्येय व धोरणे सर्वसामान्य जनतेमध्ये रुजवून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असल्याने युवकांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng