इस्लामपूर येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

शनिवार दि. ९ एप्रिल पासून ते शुक्रवार दि. १५ एप्रिल पर्यंत होणार सप्ताह…

इस्लामपूर (बारामती झटका)

इस्लामपूर येथे सालाबादप्रमाणे श्रीमद् भागवत सप्ताह दि. ९ एप्रिल २०२२ पासून ते शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ पर्यंत इस्लामपूर नजीक पूर्वेला शिंदे वस्ती, मेन कॅनल जवळ संपन्न होणार आहे. या सप्ताहाचे यंदाचे आठवे वर्ष आहे. या सप्ताहाचे नियोजन ह.भ.प‌. प्रकाश नारायण शिंदे महाराज, इस्लामपूर यांनी केले आहे. या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती व श्रीमद्भागवत वाचन पहाटे ५ ते १२ पर्यंत, दु. १२ ते १ जेवण, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व आरती, ७ ते ८ जेवण, रात्री ८ ते १० किर्तन असा असणार आहे.

या सप्ताहामध्ये शनिवार दि. ९ एप्रिल रोजी ह. भ. प. नाना महाराज पांढरे, नातेपुते यांचे कीर्तन होणार आहे. तर या दिवशी सकाळचे अन्नदाते सोपानराव धोंडीबा जाधव हे आहेत. रविवार दि. १० एप्रिल रोजी ह. भ. प. बापूसाहेब देहूकर तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदाते भगवान नामदेव कळसुले हे आहेत. सोमवार दि. ११ एप्रिल रोजी ह. भ. प. पांडुरंग महाराज शेळके, गारअकोले यांचे कीर्तन होणार आहे. तर सकाळचे अन्नदाते नागनाथ बबन साखरे हे असून वरील तीनही दिवशी गोपाळ प्रकाश शिंदे हे सायंकाळचे अन्नदाते आहेत. मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी ह. भ. प. प्रदीप महाराज ढेरे, शेंडेचिंच यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदाते दिपक लक्ष्मण पवार हे आहेत. बुधवार दि. १३ एप्रिल रोजी ह. भ. प. अंकुश महाराज रणखांबे, गिरवी नरसिंगपूर यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी सकाळचे अन्नदाते शंकर व्यंकू वाघमोडे हे आहेत. तर या दोन्ही दिवशी संध्याकाळचे अन्नदाते शंकर व्यंकू वाघमोडे हे आहेत. गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी ह. भ. प. कैलास महाराज केंजळे, धर्मपुरी यांचे कीर्तन होणार आहे. तर बाबर सर हे सकाळचे अन्नदाते असणार आहेत. शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी ह. भ. प. बापुसो महाराज ढगे, सुरवड यांचे कीर्तन होणार आहे. तर या दिवशीचे सकाळचे अन्नदाते संजय शिवाजी होनमाने हे आहेत. तरी या दोन्ही दिवशीचे सायंकाळचे अन्नदाते विठ्ठल किसन शिंदे हे असणार आहेत. शनिवार दि. १६ एप्रिल रोजीचे काल्याचे किर्तन ह. भ. प. मोहन रामचंद्र वेळापूरकर श्री संत निवृत्तीनाथ मठ पंढरपूर यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात व्यासपीठ चालक ह.भ.प. स्वामी समर्थ महाराज हे असणार आहेत. समानता, प्रेमभाव, बंधुभाव वृद्धिंगत होऊन समाज अंधश्रद्धेच्या मागे धावू लागला आहे. या काळात अधोगतीच्या मार्गाने अतिवेगाने भरकटत चाललेल्या समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी साधुसंतांच्या शिकवणुकीची अत्यंत गरज आहे. त्यातूनच परमेश्वराची प्राप्ती व्हावी, हे डोळ्यासमोर ठेवून हा आनंदी सोहळा साजरा होत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप उर्फ बापू जांभळे यांना राष्ट्रपती पदक प्रदान.
Next articleपिलीव गावात एमएसएमबी लाईटच्या मीटरचे ग्राहक कोमात तर, आकडेवाले नागरिक जोमात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here