उंबरे दहिगाव येथील प्रगतशील बागायतदार भगवान तुकाराम नारनवर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांचे भगवानदादा बंधू होते.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगावचे प्रगतशील शेतकरी भगवान तुकाराम नारनवर उर्फ दादा यांचं शनिवार दि. 24/12/2022 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते वय 72 वर्षांचे होते.

दादांवर राहत्या घराशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांचे बंधू तर माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. छायादेवी नारनवर यांचे ते थोरले दीर होते.

भगवानदादांचे वडील स्व. तुकाराम पंढरी नारनवर, आई स्व. सुंदराबाई तुकाराम नारनवर याचं 10 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडीलांची आई श्रीमती कुष्णाबाई पंढरी नारनवर आजी अजुन ठणठणीत आहेत. आजींचं वय 116 वर्षे झाले आहे. दादांच्या पश्चात पत्नी हौसाबाई आणि सुमनबाई, चार मुली गोदाबाई, माया, आशा, दिक्षा, मुलगा चि. परशुराम असे मुले आहेत. दादाचं दोन नंबरचं भाऊ संदिपान तुकाराम नारनवर, तिन नंबरचे भाऊ भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, कुंडलीक नारनवर, राजाराम नारनवर, बाजीराव नारनवर, त्यांची बहीण द्रौपदाबाई पांडुरंग ठोंबरे असा परिवार आहे.

अंत्यसंस्कारावेळी भगवानदादाचे सर्व नातेवाईक, मित्र परिवार आणि नारनवर परिवार तसेच सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम सोमवार दि. 26/12/2022 सकाळी ठीक 7.30 वाजता आहे. दादांच्या आत्म्यास शांती लाभो. नारनवर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल परिवार यांचेकडून ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण आदरांजली…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशायनिंग महाराष्ट्र २०२२ महाप्रदर्शनाचा शानदार समारोप…
Next articleमाळशिरसच्या लेकीचा तरंगफळ गावात थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच झाल्याबद्दल माहेरात सन्मान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here