उंबरे दहिगाव सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व, 13 पैकी 8 जागांवर विजय.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांनी नाद केला तर पुराच केला.

सोसायटीचे विद्यमान चेअरमन शिवाजी पाटील विजयी, विद्यमान सरपंच विष्णूपंत नारनवर यांच्या भावजय अरूणा नारनवर पराभूत तर, माजी पंचायत समितीच्या सदस्या छायादेवी नारनवर महिला प्रतिनिधी गटात सर्वात जास्त मतांनी विजयी

उंबरे दहिगाव ( बारामती झटका )

उंबरे दहिगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व झाले आहे. भाजप खुर्द व बुद्रुक एकत्र लढले होते. 13 पैकी 8 जागांवर दैदिप्यमान विजय मिळवलेला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांनी नाद केला तर पुराच केला. सोसायटीचे विद्यमान चेअरमन शिवाजी पाटील विजयी झालेले आहेत. विद्यमान सरपंच विष्णुपंत नारनवर यांच्या भावजय अरुणा नारनवर पराभूत झालेल्या आहेत. तर पंचायत समितीच्या माजी सदस्या छायादेवी सोपानकाका नारनवर महिला प्रतिनिधी गटात सर्वात जास्त मतांने विजयी झाल्या आहेत.

उंबरे दहिगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक श्री शंभू महादेव शेतकरी पॅनल या पॅनलचे सोपान तुकाराम महारनवर, शिवाजी आप्पा पाटील, ज्ञानदेव हरी ठोंबरे, संजय आनंदा ढेकळे, कल्याण गणपत नारनवर, तानाजी बापू ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे विद्यमान सरपंच श्री. विष्णुपंत शंकर नारनवर, पांडुरंग रंगनाथ ढेकळे, दत्तात्रय जगन्नाथ ढेकळे, आप्पाजी मारुती ठोंबरे, भीमराव यशवंत नारनवर, मारुती भाऊ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढलेले होते. सोसायटीचे 710 सभासद आहेत. त्यापैकी 569 मतदान पोल झालेले आहे. अकलूज सहाय्यक निबंधक संस्था कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी डि. पी. राऊत यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य सचिव अनिल चव्हाण यांनी केले.


सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात ढेकळे तुकाराम नाना 232, ढेकळे विठ्ठल बाबू 246, मकर भिमराव नामदेव 263, नारनवर शहाजी महादेव 272, नारनवर सुभाष नामदेव 231, ठोंबरे भगवान नामदेव 273, ठोंबरे भानुदास सुखदेव 236, ठोंबरे बाळासो रामचंद्र 256, ठोंबरे शंकर शिवा 284, ठोंबरे तानाजी बापू 316, ठोंबरे विजय मोहन 280, वाघमोडे बाजीराव शिवाजी 265, वाघमोडे केशव जगू 231, वाघमोडे प्रकाश निवृत्ती 262, वाघमोडे शिवाजी अण्णा 280, वाघमोडे विकास तुकाराम 232, महिला प्रतिनिधी गटात नारनवर अरुणा संभाजी 279, नारनवर छायादेवी सोपान 288, नारनवर राधाबाई तानाजी 232, नारनवर ताराबाई सदाशिव 284,
अनुसूचित जाती व जमाती गटात ढोकळे हरी सावळा 257, मोरे पोपट महादेव 298, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात सरगर पोपट राऊ 274, वाघमोडे राजाराम शंकर 279, सर्व उमेदवारांना मते पडलेली आहे. श्री शंभू परिवर्तन पॅनलचे चार विजयी व इतर मागास प्रवर्ग गटात गोरे बाळू लक्ष्‍मण बिनविरोध झाले होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleWhich in turn Business foil-literary Should i Start with 10k In India?
Next articleमाळशिरस तालुक्याच्या सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मधुकर पाटील राष्ट्रवादीचे हिंदकेसरी ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here