उघडेवाडीत थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणूकीत नणंद-भावजय यांच्या लढतीत नणंद विजयी.

मोहिते पाटील समर्थक दोन गट व विरोधी जानकर गट यांच्यामध्ये मनोमिलन, ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध सरपंच पदाची निवडणूक लागलेली होती.

उघडेवाडी ( बारामती झटका )

उघडेवाडी ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ. जिजाबाई तानाजी गवळी व सौ. रूपाली प्रभाकर भगत नात्याने नणंद भावजय असणाऱ्या यांच्यात समोरासमोर लढत लागलेली होती. त्यामध्ये नणंद सौ. जिजाबाई तानाजी गवळी विजयी झालेल्या आहेत. ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व 11 सदस्य बिनविरोध झालेली आहे.

उघडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये नितीन बबनराव चौगुले, माधव खंडू कदम, संगीता सुरेश पवार, गिरीजा सयाजी उघडे, अंजली सागर सस्ते, मिताली धनंजय साठे, संग्रामसिंह श्रीमंत माने देशमुख, प्रतिभा पोपट कोळेकर, सोनाली योगेश काटकर, महेंद्र महादेव घोगरे, लक्ष्मी शिवाजी उबाळे असे अकरा सदस्य बिनविरोध झालेले आहेत.

उघडेवाडी गावामध्ये मोहिते पाटील समर्थक 2 गट आणि विरोधी जानकर गट असा निवडणुकीत सामना नेहमी असतो. यंदाच्या निवडणुकीत राजकीय गट तट बाजूला सारून मोहिते पाटलाच्या दोन्ही गटांनी चार चार सदस्य घेतलेले असून विरोधी जानकर गटाला तीन सदस्य दिलेले होते. सर्वानुमते सौ. जिजाबाई तानाजी गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली होती. मात्र, सौ. रूपाली प्रभाकर भगत यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने सरपंच पदाची निवडणूक लागलेली होती. 2474 मतदानापैकी 1694 मतदान 4 वार्डामध्ये मतदारांनी केले होते. गवळी यांनी शिट्टी चिन्ह घेतलेले होते त्यांना 1127 मते पडलेली होती तर भगत यांचे कपबशी चिन्ह होते त्यांना 529 मते पडलेले आहेत. 598 मतांनी भगत यांची कन्या आणि गवळी घराण्यातील सून सौ. जिजाबाई तानाजी गवळी विजयी झालेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविजया मारकड यांचा थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत विक्रम
Next articleसदाशिवनगर साखर कारखाना सुरू झाला आणि सालगुडे पाटील पॅनलच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुळावर आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here