उघडेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर तिघां नराधमांकडून बलात्कार, वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद.

वेळापूर ( बारामती झटका )

उघडेवाडी ता. माळशिरस येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन तरूण नराधमांनी रविवार दि. 31/10/2021 रोजी बलात्कार केला आहे . रात्री उशिरा वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे.मौजे उघडेवाडी येथील तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार घडल्याची घटना घडली असून घटनेचे गांभीर्य घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी सहाय्यक फौजदार रेगूडे, पोलीस नाईक करे, पोलीस कॉन्स्टेबल थेटे, चालक विठ्ठल बंदुके, पोलीस मित्र अंबादास लिंगे यांचे पथक तात्काळ रवाना केले. वेळापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून आरोपी युवराज गोडसे, रणजित कोळेकर, रा. उघडेवाडी, ता. माळशिरस यांचे व एका अनोळखी विरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे ३७६, ३६६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे ४ आणि ८, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार) प्रतिबंधक १९८९ प्रमाणे ३(१)(w)(i) व ३(१)(w)(ii) प्रमाणे पोलीस सब इन्स्पेक्टर एस. आर. शिंदे अकलूज पोलीस ठाणे यांनी गुन्हा नोंद केला. यावेळी महिला दक्षता समिती सदस्या सौ. अश्विनी भानवसे उपस्थित होत्या. पुढील तपास अकलूज उपविभागीय पोलिस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसिनेअभिनेत्री आर्या घारेच्या शुभहस्ते सैराटफेम रिंकू राजगुरू च्या उपस्थितीत उद्योजक दत्तात्रय शेळके यांना पुरस्कार प्रधान.
Next articleआमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here