उत्तमराव एकनाथ माने यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

कण्हेर गावचे माजी सरपंच सुभाष माने यांचे उत्तमराव माने हे बंधू

माळशिरस ( बारामती झटका)

कन्हेर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार उत्तमराव एकनाथ माने यांचे वयाच्या 47 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, चार बंधू, भावजय असा परिवार आहे.

उत्तमराव माने यांचा मनमिळाऊ स्वभाव होता‌. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असत. गावामध्ये कोणाच्याही कार्यामध्ये ते सक्रिय असत. कन्हेर पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असणारे उत्तमराव माने यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. 20 ऑगस्ट 2022 रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्यावर कन्हेर येथील रानमळा या ठिकाणी राहत्या घराशेजारी शेतामध्ये अग्निसंस्कार केलेले आहेत. रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा कार्यक्रम) सोमवार दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.

स्वर्गीय उत्तमराव माने यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व माने परिवार यांना दुखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article20 Logic behind why Entertainment https://fancydresshut.com Is important in One of our Lifestyles
Next articleमहिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा – सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here