समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून अभिवादन
अकलूज ( बारामती झटका )
ग्रामीण भागात उद्योगांना प्रोत्साहन देऊन नवनवीन व्यवसायातून युवकांना प्रोत्साहन देणार्या तसेच समाजसेवेत अनमोल योगदान देणार्या उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या ६१ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजोपयोगी उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.
श्री क्षेत्र आनंदी गणेश येथील कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या शक्तीस्थलास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत मोहिते-पाटील परिवार व विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरीकांनी अभिवादन केले. यावेळी शिवकिर्ती बाग आनंदनगर येथे वृक्षारोपण, श्री क्षेत्र आनंदी गणेश मंदिर परिसरात झोका, घसरगंडी, भिंगरी अशा विविध खेळण्याचे उद्घाटन, लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात येऊन हर्षाली नामदेव नाईकनवरे हिस दहावी परीक्षेत ९९.२०% मार्क मिळलेबद्दल सी.ई.टी.परीक्षेची तयारी करण्यासाठी श्री आनंदी गणेश संस्थेच्या वतीने सी.ई.टी. अभ्यासक्रमाची पुस्तके देण्यात आली. तसेच अकलूजच्या उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप व चादर वाटप करण्यात आले. तसेच यावेळी टेंभुर्णी येथील गोविंद अनाथ वृध्दाश्रम येथे शालेय प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कोरोना काळामध्ये उत्कृष्ट सेवा बजावलेल्या डॉक्टर व पोलिसांना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, मार्केट कमीटीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, शिवशंकर बझारच्या चेअरमन श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील, पं.स.सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शंकरनगरचे माजी सरपंच सत्यशिल मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, शिवरत्न उद्योग समुहाचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील, बझारच्या माजी अध्यक्षा ईश्वरीदेवी मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, देवन्या मोहिते-पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व नागरीक उपस्थित होते.

शिवशंकर बझारच्या 9 व्या शाखेचे उद्घाटन
सहकार क्षेत्रात राज्यभरात नावलौकिक मिळवलेल्या शिवशंकर बझारच्या माळेवाडी येथील ९ व्या शाखेचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छ, निर्भेळ माल, माफक दरात देण्याबरोबरच ग्राहकांच्या फायद्याच्या विविध योजना राबवित असून याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng