उद्योजक दत्तात्रय शेळके यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

एकशिव ( बारामती झटका )

दि.13 नोव्हेंबर रोजी शिवपुरी एकशिव ता. माळशिरस येथे उद्योजक श्री. दत्तात्रय शेळके यांच्या सहकार्याने श्री. शहाजीदादा धायगुडे सरपंच चषकाचे आयोजन श्रीकेश भैय्या वरुडे व मित्र परिवार शिवपुरी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी उद्योजक दत्तात्रय शेळके यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, एकशिव गावचे सरपंच शहाजीदादा धायगुडे, जिल्हाधिकारी शुभम जाधव, उद्योजक सतिषतात्या ढेकळे, पिरळे गावचे सरपंच संदीप नरोळे, नातेपुते ग्रामपंचायतचे सदस्य रणवीर देशमुख, राजू गोसावी, प्रवीणशेट पांढरकर, गणेश बोराटे, बशीर काझी, गुणवंत पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष भारत रुपनवर, गुरसाळे गावचे उपसरपंच अनिल मोरे, अमोल पाटील, दशरथ जाधव, अय्याज मुलाणी, पोपट जाधव, राज माने, शिवेंद्र हुंबे, नवनाथ रुपनवर, श्रीकेश वरुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योजक दत्तात्रय शेळके यांना एकशिव ग्रामस्थांच्यावतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दत्तात्रय शेळके यांचा जन्म गाव कुरबावी येथील आहे. पूर्वीची आर्थिक परिस्थिती गरिबीची व बेताची असल्याने वडील विठोबा शेळके उदरनिर्वाह करण्याकरता शेती महामंडळाच्या जमिनीमध्ये काम धंदा करण्याकरिता गुरसाळे या ठिकाणी वास्तव्यास गेलेले होते. दत्तात्रय शेळके यांची जन्मभूमी कुरबावी तर कर्मभूमी गुरसाळे ही झालेली होती. प्रतिकूल परिस्थिती, अठराविश्व दारिद्र्य, आई-वडिलांचे उदरनिर्वाहासाठीचे काबाडकष्ट हे सर्व दत्तात्रय शेळके त्यांनी जवळून पाहिले होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून इंजिनीयर पदवी प्राप्त केली. त्यांनी नोकरी न करता उद्योग व्यवसाय सुरू केला. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरी भागात जाऊन आपला उद्योग व्यवसाय यशस्वी करून उद्योग व्यवसाय भरभराटीस आणला. त्यांनी आपण ज्या समाजामध्ये भागांमध्ये वाढलो त्या भागाचा कधीही विसर होऊ दिला नाही. त्यांनी आपल्या परिसरातील अडीअडचणीला लोकांना नेहमी व्यक्तिगत व सार्वजनिक मदत केलेली आहे. त्यामुळेच पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. संगीता दत्तात्रय शेळके यांना पंचायत समिती गणातील लोकांनी निवडून देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली होती.

पंचायत समितीचे सदस्य सौ. संगीताताई शेळके यांनी पदभार घेतल्यापासून आपल्याला काहीतरी मिळावे, असा कधीच उद्देश डोळ्यासमोर ठेवला नाही. उलट स्वखर्चाने मतदार संघात उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या सहकार्य आहे. अनेक कामे करून जनतेची अडचण दूर केली आहे. परिसरामध्ये मंदिराची उभारणी, सुशोभीकरण, धार्मिक, सामाजिक, यात्रा, जत्रा, कुस्ती मैदान, विविध स्पर्धा, नवरात्र व गणपती उत्सव अशा वेळेला लोकांना प्रोत्साहित करण्याकरता भरीव सहकार्य नेहमी करीत असतात. कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलेले असताना प्रतिकूल परिस्थितीत जनतेला आधार देण्याचे काम केलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप, दवाखान्यामध्ये आर्थिक मदत, लोकांना गैरसोय होऊ नये यासाठी जेवन डब्याची सोय असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम परिसरामध्ये दत्तात्रय शेळके यांनी स्वखर्चातून राबवलेले आहेत. आजपर्यंत केलेल्या कार्याचा गुणगौरव अनेक ठिकाणी होत असतो. संघर्षातून प्रतिकूल परिस्थितीतून उद्योजक दत्तात्रेय शेळके यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असल्याने समस्त एकशिव ग्रामस्थांच्यावतीने समाजरत्न पुरस्काराने उद्योजक दत्तात्रय विठोबा शेळके सन्मानित करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिवपुरी येथे भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न
Next articleसातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here