उन्हाळा हंगाम चारा टंचाई व त्यावरील उपाय भाग – २ सतिश कचरे मंडल कृषि अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

खरिप व रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात उपलब्ध हिरवा चारा लहान लहान तुकडे करून प्रक्रिया करून हवाबंद साठविणे व आंबविणे किन्वीकरण करणे म्हणजे मुरघास होय . प्लॅस्टीक बॅग ५ किलो ते १००० किलो ‘ प्लॅस्टिक टाकी -१०० ते ३०० लिटर ‘ जमिनीखालील व वरील गोल सिमेंट टाक्या क्रॉन्क्रीट टाक्याचा वापर यासाठी केला जातो. मुरघास हा स्वादिष्ट, पाचक, रुचकर, कटवडपणा विरहीत, संतुलीत, गोड चविष्ठ पशुआहार आहे.

मुरघास फायदे – उन्हाळी हंगामात हिरव्या चारा टंचाईवर मात, जनावराची भुक वाढविण्यास मदत, कमी जागेत जादा चारा साठवण, आगीपासून चाऱ्याचे संरक्षण, जास्त अन्नद्रव्ययुक्त चारा, चारा टंचाईवरील उपाय कमी उत्पादन खर्च पौष्टीक, रुचकर, पाचक, चविष्ठ चारा जनावरे आवडीने खातात.

मुरघासासाठी पिके – एकदल पीके – मका, ज्वारी, गोड ज्वारी, संकरीत नेपीयर मार्वेल, ऊसाचे वाढे, ओट. द्विदल पिके – गवार, लसूण, चवळी, वाल, पावटा, बरसीम इ.

मुरघास बनविणेची पद्धत – शक्यतो ४ भाग एकदल व १ भाग द्विदल याप्रमाणे पिकाचे प्रमाण घेऊन उत्कृष्ट मुरघास बनविला जातो. चारा पीक ५०% फुलोर्‍यात असताना चॉफ कटरचे सहाय्याने १ – २ इंच लाबीचे तुकडे केले जातात. जर चारा पिक एकदल असेल तर १०० लिटर पाणी + १ किलो युरीयाचे द्रावण व जर चारा पिक द्विदल असेल तर १ किलो गुळ १०० लिटर पाणी यांचे द्रावण किंवा प्रतिटन कुट्टी केलेल्या हिरण्या चार्‍यावर १ किलो युरिया + १ किलो मीठ + २ किलो गुळ + किलो खनिजे यांचे १५ लिटर पाण्यातील द्रावण तयार करून घ्यावे. एकदल द्विदल चारा पीकाचे १ – २ तुकडे करून प्लॅस्टीक बॅग प्लॅस्टीक ड्रम टाकी, सिमेंट किंवा क्रॉन्क्रीट गोल टाक्या यामध्ये एक फुट कुट्टी टाकून तुडवून दाब देऊन त्यातील हवा काढून टाकावे व प्रत्येक थराला वरीलप्रमाणे चारा प्रकार किंवा सरसकट त्याचे वजनानुसार द्रावण एकसारखे शिंपडावे व दुसरा एक फुटाचा थर द्यावा. अशा पद्धतीने प्लॅस्टिक बॅग टाकी ड्रम सिमेंट व क्रॉन्क्रीट टाक्यामध्ये चाऱ्याचे तुकडे भरून सर्वात शेवटी वाळलेले गवत अथवा कडबाने झाकून व टाकून काळ्या मातीने लिपून हवाबंद करावे. अशा पद्धतीने २ महिने ठेवून अडथळा न करता ठेवले की मुरघास तयार होतो.

घ्यावयाची काळजी – प्रत्येक १ फुटाचा थर तुडवून दाबून हवाबंद करावा अन्यथा हवेच्या व उष्णतेच्या संपर्कामुळे चारा सडणे, बुरशी वाढ होऊन चाऱ्यांची प्रत खालावते. सिमेंट व क्रॉन्क्रीट टाक्या जमिन व जमिनीखालील प्लॅस्टीक टाकी डूम प्लॅस्टिक बॅगमध्ये पाणी जाण्याचे रोखणेसाठी प्लॅस्टीक बॅग व पेपरचा वापर करावा. शक्यतो हाताळणीस सोपे, कमी खर्चात वाहतूक, सोपे प्लॅस्टीकच्या बॅग, मुरघास बनविण्यास वापराव्यात. गाभन, दुभती, पोटूशी जनावरे शेळ्या मेंढ्या यांचे वजनाचे १०% जास्तीत जास्त २० किलो पर्यंत मुरघास देण्यात यावा. अशा पद्धतीने खरिप रब्बी हंगामातील भरपूर उपलब्ध चारा साठवण करून उन्हाळी हंगामातील चाऱ्यांची टंचाईवर मात करता येते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुरंदावडे येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न.
Next articleमहाळुंग सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर तर व्हा. चेअरमन हमीद वसान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here