उन्हाळी हंगाम व हिरवा चारा (हायड्रोफोनिक) भाग-१ – सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

उन्हाळी हंगामात मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, पाळीव प्राणी, जनावरे यांना पाण्याच्या अडचणी भेंडसावतात. अशा परिस्थितीत दुभती, गाभन वाढीच्या अवस्थेतील जनावरांना शेळ्यामेंढ्या पोल्ट्री पक्षी यांना वाढ दुग्धउत्पादन व पुर्नउत्पादनासाठी वजनाच्या ५ ते १०% हिरवा चाऱ्यांची गरज असते. त्यासाठी १ किलो बियापासून ७ दिवसात ८ किलो चविष्ट रुचकर मऊ पौष्टीक भरपुर कार्बोहार्डेट, खनिजे व सप्रेरके व्हिटॅमिन्स युक्त चारा कमीत कमी पाण्यात आणि जागेत मातीविना बिया व पाण्याचा वापर करून ७ दिवसात हायड्रोफोनिक तत्रंज्ञानाचा वापर करून बनविणे काळाची गरज आहे. व ते तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.

तंत्रज्ञानाचे फायदे – वर्षभर चारा उत्पादन घेता येते. पारंपारिक पद्धतीचा विचार करता २ ते ४ लिटर पाण्यात १ किलो चारा तयार होतो. कुठल्याही किड व रोगाचा प्रार्दुभाव नसलेला चारा, चाऱ्यांचा साठा व वाहतुकीस नगण्य खर्च येतो. पारंपारिक पद्धतीपेक्षा रुचकर, पौष्टीक, चविष्ट, मऊ लुसलुसीत चारा उत्पादन.

उत्पादन पद्धत – १ किलो मका, गहु, ओट बिया यापासून ८ किलो चारा मिळतो. याप्रमाणे जर आपणास ५ ट्रे प्रतिदिन चारा लागत असेल तर आठवडासाठी ३५ ट्रे ची क्षमता असलेले १०x१० फुटाचे शेड बाबू लाकडी वासे प्लॉस्टिक खांब किंवा लोखंडी खांबाचे पूर्व पश्चिम रुंदीचे शेड बनवून त्यावर गोणपाट किंवा ७५% क्षमता असलेले शेडनेट आच्छादन करावे१. ५X3 फुटाचे १५ ते २० लहान छिद्र असलेले प्लॅस्टीक ट्रे बसणारे जमिनीपासून १ फुट उंचीवर दोन कप्यात पुरेशे अंतर ठेवून थोडासा उतार ठेवून ४ ते ५ कप्पे हताळणार्यांचे उंचीला हाताळणी सोपी होईल, असे पद्धतीने बाबुचे प्लॅस्टिकपाईप, लोखंडी पाईपचे रॅक तयार केले जातात. शेडमध्ये १५ ते ३२ डिग्री सेंटीग्रेट तापमान व ८०-८५% आर्द्रता ठेवण्याचे नियोजन केले जाते.

चारा उत्पादन पद्धत – प्रति ट्रे १ किलो बिया या प्रमाणे दररोज ५ ट्रे साठी ५ किलो बिया घेऊन प्लॅस्टीक पाटीत घेऊन ५-७ लिटर कोमट व बुरशीचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून ५० ते १०० ग्रॅम मीठासह पाण्यात १२ तास भिजवण्यास ठेवून १२ तासानंतर पाणी काढून टाकून ओलसर गोणपाटात बिया मोड येणेसाठी २४ तास ठेवल्या जातात. मोड आलेल्या बीया सच्छीद्र ट्रे मध्ये स्वच्छ हाताने एकसारख्या पसरल्या जातात. पसरलेल्या बीयांना स्पर्श अडथळा न करता स्प्रे पंपाने उन्हाळी हंगामात प्रत्येक २ तासांनी पाणी स्प्रे केले जाते व ओलावा टिकून ठेवला जातो, अशा पध्दतीने प्रत्येक ७ दिवसांनी हिरवा चारा कमीत कमी जागेत पाण्यात उपलब्ध होऊन हिरव्या चाऱ्याची गरज भागवीली जाते. हा तयार झालेला चारा वाळलेल्या चार्‍याबरोबर ५०% प्रमाणात जनावरे, शेळी, पोल्ट्री, मेंढी यांना दिला जातो. शेतकरी बांधवांनी या पद्धतीने उत्पादीत चारा ७ दिवसांनीच काढवा व वापरावा. ७ दिवसानंतर चाऱ्यांची पौष्टीकता कमी होते. तर चला करुया उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्यांची निर्मिती व वापर उन्हाळी हंगामासाठी प्रामुख्याने मका बियाचा वापर करावा. पुढील भाग – २ अझोलाबाबत समजून घेऊ या !!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांची तोफ माळशिरस तालुक्यात धडाडणार.
Next articleवेळापूर येथील सुमित्रानगर येथील बांधकामाची उलट सुलट चर्चा, स्थानिक नागरिकांत संभ्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here