उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरुध्द मुंबई महापौर केसरी पै. भारत मदने यांच्यात होणार लढत

भांब येथे श्रावण मास यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन

भांब (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील भांब येथे श्रावण मास यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान श्रावण मासातील दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्ट 2022 रोजी संभाजी बाबा दरा येथे राजमाता अहिल्यादेवी ग्रुप, आरपीआय संघटना, नरवीर उमाजी नाईक मंडळ, होलार समाज ग्रुप, अण्णाभाऊ साठे ग्रुप, समस्त ग्रामस्थ व संभाजी बाबा कुस्ती कमिटी भांब यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.

सदर कुस्ती मैदानामध्ये उद्घाटनाची कुस्ती पै. अलपेश मोटे वस्ताद भालचंद्र पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध पै. विराज राजगे तालीम संघ सातारा यांच्यामध्ये लढत होणार असून कै. बबन मारुती काळे यांच्या स्मरणार्थ धनाजी बबन काळे यांच्यातर्फे होणार आहे. तसेच पै‌. अभिषेक भिसे वस्ताद सदाशिव कोलटकर यांचा पठ्ठा विरुद्ध पै. संदीप माने यांच्यात लढत होणार असून कै. गणपत काळे यांच्या स्मरणार्थ आनंदराव भिसे यांच्यातर्फे लढत होणार आहे.

सदर कुस्ती मैदानामध्ये उपमहाराष्ट्र केसरी पै‌. प्रकाश बनकर गंगावेश तालीम वस्ताद विश्वास हरगुले यांचा पठ्ठा विरुद्ध मुंबई महापौर केसरी पै. भारत मदने वस्ताद सदाशिव कोलडकर यांचा पठ्ठा यांच्यात इनाम २ लाख रुपयांसाठी लढत होणार आहे. सदरची कुस्ती कै. ह.भ.प. निवृत्ती संभाजी काळे यांच्या स्मरणार्थ भीमराव संभाजी काळे आणि किसन संभाजी काळे यांच्यातर्फे होणार आहे. पै. वैभव माने कन्हेर, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुद्ध पै. अनिल जाधव कुर्डूवाडी शिवछत्रपती आखाडा वस्ताद कुस्ती सम्राट असलम काझी यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रुपये १ लाख यासाठी लढत होणार आहे. सदरची कुस्ती कै. राजाभाऊ संभाजी शेंडगे पाटील यांच्या स्मरणार्थ धुळा शेठ संभाजी शेंडगे पाटील उद्योजक बेंगलोर यांच्यातर्फे होणार आहे. पै प्रकाश नरोटे संग्रामनगर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध पै. सचिन ठोंबरे ठोंबरेवाडी भोसले व्यायाम शाळा सांगली यांच्यात इनाम रुपये १ लाख यासाठी लढत होणार आहे. सदरची कुस्ती कै. राजाभाऊ संभाजी शेंडगे पाटील यांच्या स्मरणार्थ धुळा शेठ संभाजी शेंडगे पाटील उद्योजक बेंगलोर यांच्यातर्फे होणार आहे.

पै. संग्राम साळुंखे संग्रामनगर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध पै. सुरज मुलाणी खुडूस वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रुपये १ लाख यासाठी लढत होणार आहे. पै. सोमनाथ सिद भांब वस्ताद त्रिमूर्ती केसरी प्रताप झंजे यांचा पठ्ठा विरुद्ध पै. मयूर मोरे पुणे वस्ताद दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रुपये ५१ हजार यासाठी लढत होणार आहे. पै. धुळदेव पांढरे भांब वस्ताद शंकर काळे नातेपुते यांचा पठ्ठा विरुद्ध पै‌. अरविंद नानेकर वस्ताद सदाशिव कोडलकर बारामती यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रुपये ५१ हजार यासाठी लढत होणार आहे.

या कुस्त्यांसह अनेक मल्लांच्या कुस्त्या यावेळी होणार आहेत. तरी पैलवान, मल्ल आणि कुस्ती शौकिनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी माळशिरस शहरातील युवा नेते दिनेश धाईंजे यांची नियुक्ती…
Next articleलोकनेते स्व. जयसिंगराव जाधव यांचे चित्र रेखाटणारा पवनराजे जाधव याचा सन्मान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here