उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्री विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब माळी यांचे भावनिक पत्र.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण लक्ष घालावे नाही तर कारखाना होता अशी नोंद राहील भविष्य.

पंढरपूर ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब माळी यांनी कारखाना सुरू होण्याविषयी भावनिक पत्र अजित दादांना पाठवलेले आहे.

प्रति
उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब
विषय. श्री विठ्ठल कारखान्यावर प्रशासन नेमून कारखाना चालवण्याबाबत
नमस्ते दादासाहेब श्री विठ्ठल कारखाना कै औदुंबर आण्णा कै यशवंत भाऊ पाटील कै सुधाकर परिचारक यांनी उभा केला सध्याच्या परिस्थितीत कारखाना अतिशय अडचणीत आहे मी कारखान्याची संचालक म्हणून दहा वर्ष अतिशय जवळून काम हे पंढरपूर तालुक्यातील जनतेला माहित आहे केले आहे हार्वेस्टिंग व्हाईस चेअरमन श्री विठ्ठल प्रशाला चेअरमन सध्या श्री विठ्ठल कारखाना चालवायचा असेल तर पंढरपूर तालुक्यातील सभासद आजी-माजी संचालक सर्व पक्षीय नेते बरोबर घेऊन जावे लागेल इतर बाराशे अडीच हजार कपॅसिटी चा कारखाना चालवणे सोपे आहे परंतु हा मोठा कारखाना आहे याची क्रॉसिंग दहा लाखाच्या पुढे झाल्याशिवाय परवडत नाही तरी कारखाना पूर्ण समतेने चालवण्यासाठी आमदार श्री प्रशांत मालक परिचारक आमदार श्री बबन दादा शिंदे यांनी यांच्या कारखान्याची ऊसा सहित यंत्रणा दिली तरच हा कारखाना चालू शकतो अन्यथा भविष्यकाळात येथे श्री विठ्ठल कारखाना होता असे नोंद होईल ज्याचे फार दुःख वाटत आहे तरी आपण पक्षांना बघता सर्वांना एकत्रित करून दोन्ही आमदारांना विचारात घेऊन हा कारखाना चालू करण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे
कळावे आपला
बाळासाहेब माळी
मा संचालक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना
मा जिल्हा परिषद सदस्य सोलापूर.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्हा आरपीआयचा स्वाभिमान राजाभाऊ सरवदे श्रीपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते बरोबर मनमोकळ्या गप्पा मारत असताना. – बी. टी. शिवशरण
Next articleसांगोला तालुक्यातील कटफळ हद्दीतील शेतजमीच्या वादातून ड्रॅगन फ्रुट व आंब्याच्या झाडांचे 25 ते 30 लाखाचे नुकसान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here