उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आयकर विभागाची टाच वृत्त निराधार

वस्तुस्थितीशी विसंगत खोडसाळपणाचे निराधार वृत्त आहे – ॲड. प्रशांत पाटील

मुंबई ( बारामती झटका )

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजितदादा पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजितदादा पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजितदादा पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजितदादा पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती येथे ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन संपन्न
Next articleमाळशिरस करांच्या विकास कामात नेहमी सोबत राहणार – युवा आमदार रोहितदादा पवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here