उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार श्रीक्षेत्र अरण येथे माळी समाजाचा मेळावा – कल्याण (काका) आखाडे

बारामती (बारामती झटका)

संत शिरोमणी सावता महाराज यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र अरण (जि. सोलापुर) येथे दि. ३० एप्रिल रोजी दु. १२.३० वा. सावता परिषदेच्या वतीने माळी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातून ‘एक दिवस आपल्या समाजासाठी’ या भावनेने माळी समाजातील बांधव लाखोंच्या संख्येने स्वखर्चाने उपस्थित राहणार आहे. याबाबत संयोजक सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, युवक प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांनी माहिती दिली.

या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित राहणार आहेत. श्रीक्षेत्र अरणच्या विकासाचे भवितव्य ठरविणारा माळी समाजाचा हा भव्य मेळावा ख-या अर्थाने भव्य व्हावा यासाठी राज्यभरातील माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. समाजाच्या एकजुटीचे प्रदर्शन घडवावे, असे आवाहन संयोजक सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्व. कोंडीबा बिरा गोरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह.भ.प. नंदकुमार महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.
Next articleकण्हेर सोसायटीच्या मतदानात चुरस 317 पैकी 302 मतदारांनी हक्क बजावला निकालाची लागली उत्कंठा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here