उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी भाजप नेते के. के. पाटील यांचा सन्मान केला

माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे के. के. पाटील यांचे राजकीय सारथ्याचे दर्शन पहावयास मिळाले.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील यांचा निमगाव मगराचे, ता. माळशिरस या ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व करून एक हाती भाजपचा झेंडा फडकवल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या वेळी चाणक्याची भूमिका बजावणारे विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय, भाजपा शिक्षक संघटनेचे प्रशम कोल्हे त्यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. के. के. पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीचे तीन वेळा सदस्य पद भूषविलेले आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. ज्योतीताई पाटील जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या आहेत.

माळशिरस तालुक्याच्या राजकारणात प्रस्थापितांच्या विरोधात राजकारण करून भाजपच्या विचारापासून कधीही फारकत घेतलेली नाही. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका के. के. पाटील यांनी बजावलेली आहे. भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले असताना स्वतः गाडी चालवत के. के. पाटील यांना पुढे बसवून पाठीमागील सीटवर भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख बसलेले होते. ताफ्यामध्ये भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे व अन्य भाजपचे पदाधिकारी यांनी प्रवास केलेला आहे.

माळशिरस तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले आहे. भविष्यात निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्याला पक्षातून निश्चितपणे पाठबळ मिळणार असल्याचे चित्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी केलेला सत्कार आणि माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले सारथ्य यामुळे माळशिरस तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रतिकूल परिस्थितीतून सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कै. अनिल रजपूत
Next articleमाळीनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाशराव निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here