Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

“उपमुख्यमंत्री फडणीस यांना भेटलो म्हणजे मी भाजपात जाणार असे कोणीही समजू नये….” आमदार बबनदादा शिंदे यांचे स्पष्टीकरण

बेंबळे (बारामती झटका) मुकुंद रामदासी यांजकडून

“मी आज दि. 25 जुलै रोजी आमच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्त दिल्लीला आलो होतो. व आम्ही महाराष्ट्र सदन दिल्ली येथे वास्तव्यास होतो. या ठिकाणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे देखील आलेले होते. आज 25 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या पदग्रहण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस हे देखील दिल्लीला आले होते. व तेही महाराष्ट्र सदनमध्ये आले होते. सकाळी देवेंद्रजी फडणीस महाराष्ट्र सदनाच्या मुख्य कार्यालयात बसलेले आम्हाला समजल्यानंतर आम्ही सहजासहजी त्यांना भेटण्यास गेलो. मी कारखान्याच्या व मतदारसंघातील रखडलेल्या सिंचन योजनांच्या कामासाठी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले व त्यांनीही ऐकून घेऊन “बर ठीक आहे म्हणाले”.

अगदी काही मिनिटांमध्ये महाराष्ट्र सदनमधील काही मराठी वाहिन्यांच्या पत्रकारांनी आम्ही बसलेलो व काही अंतरावर उपमुख्यमंत्री फडणवीस बसलेले फोटो काढून लगेच आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार…, मोहोळचे राजन पाटील व माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे भाजपच्या वाटेवर, नामदार फडणीस यांच्याशी दिल्लीमध्ये चर्चा…. अशा बातम्या सर्वत्र प्रसारित केल्या. त्यानंतर आम्हाला राज्यातील, जिल्ह्यातील व मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांचे, वरिष्ठ लोकांचे, दैनिकांच्या संपादकांचे व पत्रकारांचे सारखे फोन येऊ लागले. परंतु मी स्पष्ट सांगतो की मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही व आम्ही राष्ट्रवादीतच आहोत व आहे इथेच आहोत.

मला दिल्लीमध्ये बाहेर आल्यानंतर टी.व्ही. पत्रकारांनी विचारले की, मग दादा भाजप प्रवेश केव्हा ?, परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितले की, तसा काहीही विचार नाही, आम्ही आमच्या कारखान्याच्या व इतर काही कामासाठी येथे आलेलो आहोत. सहजासहजी फडणवीस साहेब या ठिकाणी आलेले समजल्यामुळे आम्ही भेटण्यासाठी गेलो होतो. ज्यांची सत्ता असते त्यांच्या वरिष्ठांना भेटण्यात काहीच गैर नाही. माझ्या मतदारसंघातील कारखान्याचे प्रश्न आहेत, पाणी योजना तसेच रखडलेल्या सिंचन योजना यांचेही प्रश्न मार्गी लावण्याचे आहेत यासाठी मी दिल्लीत आलेलो आहे. नंतर अवघ्या काही मीनिटातच मी बाहेरही आलो. या ठिकाणी टीव्हीच्या काही पत्रकारांनी, मग दादा भाजप प्रवेश केव्हा ?असे विचारले असता मी त्यांना नो कॉमेंट्स, असे स्पष्ट सांगितले.

ना. फडणीस साहेबांना भेटलो म्हणजे मी भाजपात जाणार, असा चुकीचा अर्थ व निष्कर्ष टीव्ही चॅनलच्या लोकांनी काढला व संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र ब्रेकिंग न्युज म्हणून त्याचे प्रसारण केले. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की, मी आहे येथेच आहे. कोणीही संभ्रम वा चुकीचा अर्थ करून घेऊ नये व गैरसमज पसरवू नयेत. – आ. बबनदादा शिंदे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort