उपासक विनोद व उपासिक करिष्मा यांचा मंगल परिणय पर्यावरणाचा समतोल राखून संपन्न झाला.

शुभविवाह ड्रीम सोशल फाउंडेशन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षदादीदी देशमुख जाधव, जिल्हा परिषद सदस्य रणजीतभैय्या शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

महाळुंग ( बारामती झटका )

आयुष्यमान अनिता व भास्कर लक्ष्‍मण भोसले रा. लवंग, ता. माळशिरस यांचे चिरंजीव उपासक विनोद व आयुष्यमान महानंदा व अंकुश बनसोडे रा. अकोले खुर्द, ता. माढा यांची कन्या उपासिक करिष्मा यांचा मंगल परिणय रविवार दि. ०५/१२/२०२१ रोजी दु. १२.४० वा. गणेशगावपाटी, अकलूज-टेंभुर्णी रोडवरील नंदेश्वर मंगल कार्यालय, लवंग येथे महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग संभाव्य धोका टाळण्यासाठी सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता आलेल्या पाहुण्यांचा पेरुचे वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

या मंगल परिणयप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी संचालक ड्रीम सोशल फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक माजी सनदी अधिकारी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या सुकन्या हर्षदादीदी देशमुख-जाधव, माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष सदस्य रणजीतभैय्या शिंदे, राहुरी तालुक्यातील खांडवी बुद्रुकचे सरपंच कैलास पवार, लवंग ग्रामपंचायतचे सदस्य धनाजी चव्हाण, विशाल पाटील, युवा उद्योजक राहुलदादा टिक, राजकुमार पाटील, रामदादा चव्हाण, मधुकर वाघ, उत्तम भोसले, शहाजी कदम, प्रशांत पाटील, ह.भ.प. किसनतात्या चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, निखिल चव्हाण, विक्रांत रेडे पाटील, केचे पाटील, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी नंदेश्वर मंगल कार्यालय गेट समोर आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती. आलेल्या मान्यवरांचे भोसले व बनसोडे परिवार यांचेकडून स्वागत करण्यात येत होते. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता हार, गुच्छ, फेटा श्रीफळ न देता पेरूचे रोप देण्यात येत होते.

उपासक व उपासिका यांचेकडून तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पंचशील व त्रीशील यांचे पठण करून वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांनी वधू-वरांवर पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात आनंदाने भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहुकर महाराज, मळोली यांचे सुश्राव्य किर्तन.
Next articleमाजी खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन व थेट संपर्कासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाईन सेंटर कार्यालयाचा शुभारंभ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here