उल्हास प्रभातचा दीपावली विशेषांक लवकर प्रकाशित होणार, साहित्यिकांना आवाहन

बदलापूर (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून

उल्हास प्रभात वृतपत्राचा यावर्षीचा २८ वा दीपावली विशेषांक लवकरच पुस्तक रुपाने आकर्षक स्वरुपात प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी साहित्यिकांनी विविध प्रकारचे अप्रकाशित साहित्य उदाहरणार्थ लेख, कथा, कविता, मेन, आरोग्य विषयक माहिती, सौंदर्य विषयक माहिती, विनोद, व्यंगचित्रे, किचन टीप्स, पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाणे आदी प्रकारचे साहित्य दि. १५ ऑगस्ट पर्यंत मिळेल, अशा बेताने सुवाच्च हस्ताक्षरात किंवा टंक लिखित कागदाच्या एकाच बाजूस लिहून पाठवावे.

असे आवाहन उल्हास प्रभातचे संपादक डाॅ. श्री. गुरुनाथ बनोटे यांनी केले आहे. पत्ता – नंदकुमार बनोटे, रूम नंबर. ५०२ इ विंग, श्रीनिवास रेसिडेन्सी, गायत्री गार्डन जवळ, कात्रप, बदलापूर (ईस्ट), ता. अंबरनाथ, जि. ठाणे, पिन कोड – ४२१५०३

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकोथळे येथे बाजरी पीक प्रात्यक्षिक निविष्ठा व पोषण आहार मिनीकिट वाटप संपन्न…
Next articleरत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाची १४ ऑगस्टला सर्वसाधारण सभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here