अकलूज ( बारामती झटका )
शेतकऱ्याने तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या
उसाला तुरे आल्यानंतर उसाच्या वजनात मोठी घट होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. निसर्गाच्या अवकृपेमुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी नवीन संकट शेतकऱ्यांवर आल्यावर हतबल होत आहे. मागील दोन वर्षापासून संकटाची मालिका सुरू आहे. नवीन संकट उसाला तुरे येऊन आलेले आहे.
कृषी विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या मते चालू वर्षी पाऊस ज्यादा झाल्याने व उसाच्या पिकात बरेच दिवस पाणी साचल्याने नत्राची कमतरता भासते, जमिनीत असलेले नत्र खालच्या थरात जाऊन बसतात, परिणामी उसाची वाढ थांबते व तुरे येण्यास प्रारंभ होतो. तुरे आल्यावर एका महिन्यात उसाला धस्सी पडायला सुरुवात होते त्यामुळे ऊस पोकळ होतो व उसाच्या वजनात मोठी घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng