नाशिक (बारामती झटका)
सध्या महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम चालू झाला आहे. ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी मधून ऊसाची वाहतूक केली जाते. अनेक वेळा ट्रॅक्टरला डबल ट्राॅली जोडलेली असते. तसेच वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात ऊस भरला जातो. त्यामुळे ऊस वाहतूक बर्याच वेळा धोकादायक पध्दतीने केली जात आहे.
तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर अनेक वेळा कर्कश आवाजात गाणी लावून रस्त्याने चाललेले असतात. रात्रीच्या वेळी अनेकदा ट्रॅक्टरच्या हेडलाईटचा एकच दिवा चालू असतो. त्यामुळे समोरच्या मोटारसायकल अथवा वाहन चालकाला अंदाज येत नाही. तसेच ट्राॅलीला मागे तांबड्या रंगाचा दिवा लावला जात नाही. तसेच अंधारात चमकणारे रिफलेक्टर लावले न गेल्याने किंवा जुने झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे अनेकदा अपघात होत आहेत.

सर्व साखर कारखान्यांनी याबाबत दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तशा प्रकारच्या सुचना संबंधित ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना देणे गरजेचे आहे. तसेच इतरही नागरिकांनी आणि वाहन चालकांनी रस्त्याने प्रवास करताना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून सांभाळून प्रवास करावा नुकताच नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तीन मित्रांचा उसांनी भरलेल्या ट्रक्टर ट्रालीला पाठीमागून धडक दिल्याने तिघांचाही दुर्दैवाने अंत झाला, त्यामुळे तिन्ही कुटुंब अनाथ झाले, पोलिसांनी अशा प्रकारे धोकादायक पध्दतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना योग्य ती समज देऊन कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
