लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन
बीड (बारामती झटका)
आजचा दिवस आपल्यासाठी संस्मरणीय असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री मुंडे म्हणाले, ऊसतोड कामगारांशी आपले भावनिक नाते आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात महामंडळाची घोषणा केली आणि टनामागे दहा रुपये कारखाने आणि दहा रुपये राज्य सरकार देईल, असा निर्णय घेतला. हा निर्णय कामगारांच्या कल्याणासाठी महत्त्वाचा ठरेल. महामंडळाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याप्रती सन्मानाची भावना आणि त्यांना आदरांजली अर्पण केल्याचे ते म्हणाले. पंडित अण्णा मुंडे यांनी ऊस तोडणीचे काम केले. त्यांचा मुलगा माझ्यासोबत मंत्रीमंडळात आहे याचा मला अभिमान आहे, असे यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.
ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर आधार जोडणी करून त्याच मजूरांना काम द्यावे लागणार आहे. त्यामुळे मजुरांचा त्रास वाचण्यासोबत कारखान्यांचाहि फायदा होईल. मजुरांच्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी भविष्यात महामंडळ घेणार आहे. चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी अशा संस्थांशी करार करण्याचाही प्रयत्न होणार आहे. महिलांच्या आरोग्याची जबाबदारी घेताना ऊसतोड कामगारांच्या विम्याची जबाबदारी भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात येईल. त्यांचे श्रम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात येईल, असे ते म्हणाले. पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या या महामंडळास अस्तित्वात आणण्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आता आम्हाला कायमस्वरूपी निधीची सोय देखील झाली आहे की पुण्यात पाचशे मुलांसाठी आणि पाचशे मुलींसाठी असे 1000 क्षमतेचे उच्च शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतिगृह मंजूर करून द्या बाकी काही नको, अशी विनंती यावेळी धनंजय मुंडे यांनी केली.
ऊसतोड कामगार नेते डॉ डी. एल. कराड यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले. ऊसतोड कामगारांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते ऊस तोड कामगार नोंदणी संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या बोधचिन्ह व ऊसतोड कामगारांच्या व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते ऊसतोड कामगारांचा सत्कार यावेळी करण्यात आला. व त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारनवरे यांना ऊसतोड महामंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी लघु चित्रफितीच्या माध्यमातून महामंडळाच्या निर्मितीचा प्रवास मांडण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार रोहितदादा पवार, नरेंद्र दराडे, आ. अतुल बेनके, आ. संजय दौंड, आ. सुनील टिंगरे, आ. सुनील शेळके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते. त्याचबरोबर माजी आमदार केशवराव आंधळे, दत्तात्रय धनकवडे, शितलताई सावंत, सुशीलाताई मोराळे, रेखाताई टिंगरे, रामकृष्ण बांगर, नंदकुमार मोराळे, श्रीमंत जायभाये, सारंग आंधळे, प्रदीप भांगे, दत्तोबा भांगे, गोरक्ष रसाळ, पंढरीनाथ थोरे, दादासाहेब मुंडे, विष्णुपंत जायभाये यांच्यासह विविध ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मुंडे व महाजन कुटुंबाच्या व युतीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी धनंजय मुंडे यांनी हे संबंध पुढच्या पिढीतही टिकवले असून लवकरच ऊसतोड कामगार मेळावा घ्या, कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बीडला येणार असल्याचे म्हटले.
धनंजय मुंडे यांनी आपल्या वडिलांनी ऊस तोडणीचे काम केले, आजही एक कामगार प्रवासात भेटला, त्याचा हात हातात घेतला तर त्याच्या हाताला पडलेल्या घट्ट्यांवरून त्यांच्या कष्टांची जाणीव झाल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. या भाषणादरम्यान मुंढे हे चांगलेच भावुक झाले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng