एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीच्या लढ्यात सामिल व्हा. – रणजित बागल

पंढरपूर (बारामती झटका)

ऊसदर एफआरपीचे तुकडीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.. केंद्र व राज्य सरकार यांच्या संगनमताने व राज्य शासनाच्या दिलेल्या संमतीमुळे हा कुटील डाव खेळला जात आहे.. या विरोधात सर्व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होवुन सर्वांनी या लढ्यामध्ये एकत्र यावे असे आवाहन यावेळी बागल यांनी केले..
सोनके ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने एकरकमी एफआरपीच्याबाबत शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आली होती यावेळी बोलताना यंदाच्या ऊस गळीत हंगामासंदर्भात देखील स्वाभिमानीची भुमिका बागल यांनी विशद केली.. यंदा ऊसाचे क्षेत्र जरी जास्त असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात साखर देखील तेजीत आहे.

पुढे मार्च अखेरपर्यंत हे दर असेच स्थिर राहतील अशी शक्यता आहे. इथेनॉल देखील उच्चांकी दरावर आहे.. याचा फायदा मात्र थेट शेतकऱ्यांना मिळायला हवा आणि यंदा एकरकमी एफआरपी सह तिनशे रूपये हे मिळालेच पाहिजेत यासाठीच यंदा हा लढा स्वाभिमानीकडुन लढला जाणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या दामासाठी संघर्षाची तयारी ठेवावी असे पुढे बोलताना बागल म्हणाले..
यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल सोनके गावचे माजी सरपंच तानाजी गोफणे,संतोष बागल,यशवंत बागल यांच्यासह सोनके गावातील प्रतिष्ठित मान्यवर व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाढा ते अकलूज या दोन तालुक्यांना जोडणारा चौपदरी महामार्ग मंजूर करावा.
Next articleयशस्वी उद्योग व्यवसाय करून सामाजिक बांधिलकी जपत जनतेची सेवा करणारे समाजसेवक दत्तात्रय शेळके.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here