एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन

सांगली (बारामती झटका)

उसाची FRP टप्प्यात दिली पाहिजे, यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार देखील प्रयत्नशील आहे. राज्यसरकारने देखील उसाची FRP 3 टप्प्यात (60+20+20) देण्यात यावी, अशी केंद्राकडे शिफारस केली असल्याचे समजले. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. केंद्रात जर BJP चे सरकार आहे तर महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा विरोध केला पाहिजे आणि FRP एकरकमी द्यावी, असा आग्रह केला पाहिजे. आपसूक BJP बॅक फूटवर जाईल आणि महाविकास आघाडीची लोकप्रियता वाढेल. कदाचित हा निर्णय मविआ च्या आमदारांना मान्य नसेल, याबाबत जास्त बोलायची गरज नाही.

60% जर पहिला हफ्ता मिळाला तर 1600 ते 1700 च्या आसपास पहिला हफ्ता मिळेल जो सोसायटी आणि कर्ज भागवण्यात जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील ही कंडिशन आहे तर, मराठवाडा आणि विदर्भात तर परिस्थिती विचारायला नको. दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे तर विचारायला नको. आताच काही कारखाने एकच हफ्ता देतात नंतर त्यांना आयतेच कोलीत मिळेल. आज सगळ्या पिकांचा विचार केला तर ऊस हा आपण उधारीवर कारखान्याला देतोय. कधी पैसे मिळतील, किती मिळतील याची खात्री नाही. बाकीच्या पिकात काहीतरी भाव मिळतो पण ऊस हा उधारच द्यावा लागतोय. या बाबतीत आताच जागे व्हा नाहीतर आयुष्यभर गुलाम होण्याची तयारी ठेवा.

या तुकड्यात FRP ला विरोध करण्यासाठी होय आम्ही शेतकरी समूहामार्फत आपण डिजिटल आंदोलन छेडत आहोत. शनिवार दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 ते 9 या वेळेला #एकरकमी_ FRP हा हॅशटॅग करून आपल्याला फेसबुक, ट्विटर, इंस्टाला पोस्ट करायच्या आहेत. जेणेकरून आपल्या मनातील आक्रोश सरकारपर्यंत मांडता येईल. तरी सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी समूहामार्फत आवाहन करण्यात येते की, प्रत्येकाने या डिजिटल मोहिमेत सहभागी व्हावे व आपली एकी दाखवावी असे आवाहन डॉ. अंकुश चोरमुले आष्टा, सांगली यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेतकऱ्यांच्या हक्काच्या दामासाठी “स्वाभिमानी” ची राज्यभरातील ऊस उत्पादक व शेतकरी पुत्रांच्या साथीने #एकरकमी_FRP ही हॅशटॅग मोहिम..
Next articleपुणे विभागातील 19 लाख 28 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

1 COMMENT

  1. आम्हाला एकरकमीच FRP पाहिजे तर आणि तरच शेतकरी टीकेल नाहीतर शेतकरी उद्वस्त होईल . आपण ही चळवळ चालू करूया सर्वांना संघटीत करूया . आज चळवळ आणि असहकार हे दोनच मार्ग योग्य आहेत. वाटले तर आंदोलन करू आणि जोपर्यत एकरकमी FRP मिळत नाही . तोपर्यत कारखाण्यांचे धुराडे पेटू दयायचे नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here