एकशिव पाणी वापर संस्थेतील भ्रष्टाचारामुळे संचालक मंडळ बरखास्त.

पाणीवापर संस्थेचा भ्रष्टाचार सिद्ध झाला पण, शेतकऱ्यांचे पैसे कोण देणार ? तक्रारदार ॲड. प्रशांत रुपनवर यांचा सवाल.

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील एकशिव पाणी वापर संस्था एकशिव यामध्ये झालेला भ्रष्टाचार सिद्ध झालेला असून त्यास सर्व संचालक मंडळ जबाबदार धरण्यात आलेले आहे. यावरून पुणे पाटबंधारे मंडळ सहाय्यक अधीक्षक अभियंता रा. वी. सावंत यांनी निरा उजवा कालवा विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता यांना संचालक मंडळ विसर्जित करण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करावी, असा आदेश देण्यात आलेला असल्याने माळशिरस तालुक्यात खळबळ माजलेली आहे. एकशिव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. रामहरी गोविंद रुपनवर, सचिव दादासो जगू दडस हे आहेत. संचालक मंडळामध्ये शिवाजी नामदेव गावडे, गणपत महादेव दडस, गुणवंत नारायण पाटील, संग्रामसिंह ज्ञानदेव रुपनवर, रामचंद्र किसन खंडागळे, प्रकाश राऊ जानकर, काशीम दाऊद मुलाणी, रुक्मिणी उत्तम शेंडगे, कौशल्या लक्ष्मण साळवे, दुर्गाबाई नारायण रुपनवर, रंजना रामचंद्र जाधव असे संचालक आहेत. त्यापैकी काशीम दाऊद मुलाणी हे मयत आहेत. सर्व संचालक मंडळ विसर्जित करण्याच्या सूचना केलेल्या असून पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नवीन संचालक मंडळ कार्यरत असने गरजेचे असल्याने पहिले संचालक मंडळ बरखास्त केलेले आहे. नवीन संचालक मंडळाची लवकरच निरा उजवा कालवा विभाग फलटण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करतील.

एकशिव येथील राष्ट्रसेवा शेतकरी गटाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत सुरेशराव रुपनवर पाटील यांनी कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडे एकशिव पाणीवापर संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत रीतसर तक्रार केली होती. कार्यकारी उपअभियंता व शाखा अधिकारी यांनी संस्थेचे कारभार व दप्तर तपासणी करून सदरच्या या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेला होता. पुणे पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता रा. वी. सावंत यांनी भ्रष्ट संचालक मंडळ नष्ट करून नवीन संचालक मंडळाची नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत.

सदर आदेशाची प्रत तक्रारदार ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून संचालक मंडळ यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे संचालक मंडळ बरखास्त झालेले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पैशाचे काय, असा प्रश्न उपस्थित करून भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशासाठी लढा देऊन संचालक मंडळातील खरे भ्रष्ट कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यासाठी भविष्यात पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफडतरी विकास सेवा सोसायटीच्या बिनविरोध संचालक मंडळातील चेअरमन व व्हाईस चेअरमन कोण होणार ? लागली उत्सुकता…
Next articleम्हसवड येथील वाळूचा माळशिरस तालुक्यात सुळसुळाट, वाळू माफियांचा धुमाकूळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here