आगामी काळामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव धूरळा करणार का ?
एकशिव ( बारामती झटका )
मौजे एकशिव ता. माळशिरस, विकास सोसायटी निवडणूक अतिशय रंगतदार अशी झाली. खऱ्या अर्थाने या लढतीकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले होते. पश्चिम माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाचा एक पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पॅनल अगदी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाची ही रंगीत तालीमच होती. मोहिते-पाटील गटाकडून तर या चुरशीच्या लढतीमध्ये स्वतः विद्यमान सरपंच धायगुडे यांनी तर स्वतःच्या आईलाच उमेदवारी देऊन स्वतःचं राजकीय अस्तित्व पणाला लावलं होतं. रंगतदार लढतीमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. पंचक्रोशीमध्ये या सोसायटीच्या जय-पराजय याची चर्चा रंगली. सर्वसामान्य सभासदांनी राष्ट्रवादी व काँग्रेस गटाला विजयाची माळ घातली व 12/0 एक हाती सत्ता सत्ताधारी गटाकडे सोपवली त्याबद्दल पॅनलचे मार्गदर्शक नेते काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. राजाभाऊ रुपनवर पाटील त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले. पॅनल विजय झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, आमदार रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. सुरेशआबा पालवे यांनी फोन करून पॅनल प्रमुखांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

गावामध्ये सर्व सभासदांच्या वतीने विजयी उमेदवारांची जल्लोषमय वातावरणामध्ये मिरवणूक काढण्यात आली. या विजयासाठी अहोरात्र कष्ट करणारे पॅनलचे मार्गदर्शक नेते माजी चेअरमन श्री. भगवान अप्पा रूपनवर, माजी सरपंच श्री. मोहन हरिभाऊ रुपनवर, श्री. किसन रुपनवर (साहेब), राष्ट्रवादीचे नेते श्री. सौरभ बागनवर, श्री. सुरेश जाधव, आजिनाथ रुपनवर, गोरख आबा रुपनवर, शिवाजी गावडे, डॉ. सचिन पाटील, आप्पासाहेब दडस, किशोर पाटील, संग्राम पाटील, ग्रा. सदस्य श्री. शशांक बागनवर आजी-माजी सदस्य अशा अनेकांनी या विजयामध्ये बहुमूल्य सहकार्य केले आहे.

आगामी काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष सोसायटीच्या धरतीवर एकत्र आल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पराभवाचा धुरळा करणार का ? असे राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng