एकशिव ( बारामती झटका )

विविध कार्यकारी सोसायटी एकशिव ता. माळशिरस यांच्यावतीने सोसायटी सभासदांना 11% डिव्हिडंड वाटप चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी सोसायटीचे मार्गदर्शन माजी चेअरमन ग्रा. सदस्य श्री. भगवान बापूराव रूपनवर, राजाभाऊ पाटील, चेअरमन लक्ष्मण रुपनवर, व्हाईस चेअरमन श्री. शिवाजीराव गावडे, सोसायटी सदस्य श्री. ज्ञानदेव रुपनवर, डॉ. सचिन पाटील, संग्रामसिंह रुपनवर, गुणवंत रूपनवर, हरिभाऊ साळवे, ज्येष्ठ सभासद श्री. दत्तात्रय रुपनवर, प्रकाशराव जानकर, नाना पाटील, गोरख रुपनवर, नामदेव पाटील, महादेव तुपे, विजय रूपनवर, अमोल रूपनवर, बाजीराव खताळ, राम गावडे, दादासाहेब दडस, शॉप किपर श्री सोमनाथ (तात्या) रुपनवर, सचिव प्रफुल्ल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.सोसायटी सभासदांना 11% लाभांश वाटप होत असल्याने ऐन दिवाळीत सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इथून पुढच्या सोसायटीच्या प्रगतीच्या कार्यकाळात सभासदांना जास्तीत जास्त लाभांश व कर्ज वाटप व्हावीत असे मत सोसायटीचे अर्थतज्ञ संचालक श्री. अरुण बागनवर यांनी व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng