गावच्या व तालुक्याच्या राजकारणामध्ये लोकप्रिय सरपंच शहाजीदादा धायगुडे यांनी अनेक वेळा विरोधकांना पराभवाची धूळ चारलेली आहे. सोसायटीच्या विजयाने हुरळून जाऊ नये.
एकशिव ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील एकशिव विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली.
श्री. शहाजी लिंबाजी धायगुडे व माजी चेअरमन श्री. भगवान कृष्णा रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक पार पडली. प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादी पॅनलला कडवी झुंज दिली. निवडणुकीत उमेदवारांचा निसटता पराभव झालेला आहे.
उत्पादक प्रतिनिधीमध्ये थोडक्या मताने पराभव झालेला आहे. तर महिला प्रतिनिधी मतदारसंघात अवघ्या दोन मताने सरपंच शहाजीदादा धायगुडे यांच्या मातोश्री यांचा निसटता पराभव झाला आहे. सोसायटीच्या विजयाने विरोधकांनी हुरळून जाऊ नये गावच्या व तालुक्याच्या राजकारणामध्ये लोकप्रिय सरपंच शहाजीदादा धायगुडे यांनी अनेक वेळा पराभव केलेला आहे. पराभवाची धूळ चारलेली आहे, असे सहकार पॅनल मधून बोलले जात आहे.
एकशिवचे विद्यमान सरपंच श्री. शहाजीदादा धायगुडे यांच्या पत्नींनी पंचायत समितीवर एकशिव गणातून पाच वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. स्वतः श्री. शहाजी धायगुडे यांचा ग्रामपंचायतला सलग सात वेळा निवडून येण्याचा विक्रम आहे. चार वेळा सरपंच होण्याचा बहुमान एकशिव ग्रामस्थांनी त्यांना दिला आहे. जनतेच्या अफाट प्रेमावरच आणि विकास कामाच्या जोरावर जनतेने विश्वास दिलेला आहे. सोसायटी महिला मतदार संघात मतदार व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मातोश्रींना उमेदवारी दिली होती. त्यात दोन मताने निसटता पराभव झाला.
वास्तविक सोसायटी म्हटले कि, ठराविक मतदार असतात. त्यातही सदोष मतदार याद्या तसेच सोसायटीचा काडीचा संबंध नसणारे कधीही सोसायटी कर्ज घेतले नाही असे मतदार हे यादीत समाविष्ट असतात. फक्त वारस म्हणून असणारे यादीत समाविष्ट असल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा पंचक्रोशीत आहे. गावच्या व तालुक्याच्या राजकारणासारखे भविष्यात सोसायटीमध्ये सुद्धा सहकार पॅनल यश संपादन करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng