एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष फक्त तेजसदादा…!

सातारा ( बारामती झटका )
एक पर्व, नवे पर्व ,तेजस पर्व …!” हे जोडलेले हात…! हातात घेतलेला हात…! श्वासात घेतलेला ध्यास…! हा हात जोडून उभा असणारा युवा जिल्हाध्यक्ष, आपल्या कृतीतून खूप काही सांगून जातोय. नवीन तेजस पर्व, सर्वसामान्य माणसांसाठी, अडीअडचणीतल्या बंधू-भगिनींसाठीच नवीन तेजस पर्व, उध्वस्त झालेले संसार परत उभे करण्याचे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. मी तुमचा तेजस …! तुमच्याच घरातील लहान भाऊ, तुमच्या घरातील सदस्य, मी तुमचाच आणि तुमच्यासाठीच !

सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही अडचणीच्या प्रसंगात जिवाची पर्वा न करता 24 तास फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच मी स्वतःला समर्पित करतो.एक महिना जणू काय पायाला भिंगरी बांधून दादा 24 तास सर्वसामान्य कुटुंबांसाठी. माझ्या कुटुंबावरती आलेली दुःखद घटना, अनेक घरे, कुटुंब उध्वस्त झाली, या भावनेतून त्यांना अहोरात्र मदत करण्यासाठी धावत होते. एवढ्या कमी वयात एवढा मोठा दुरदृष्टीकोन समोर ठेवून 24 तास आपण यांना मदत कशी केली पाहिजे ?, यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल ?, त्यासाठीची धडपड चालू होती. स्वतः वाहन हातात घेऊन आपल्या सोबत मोजकेच कार्यकर्ते घेऊन दादांनी 24 तास फक्त मदत कार्याला वाहून घेतलं होतं.

आई-वडील, भाऊसुद्धा तेजसदादाला विसरून गेले होते. आमदार साहेबांच्या तोंडून हे ऐकायला भेटलं होतं कि, “तेजस आम्हाला विसरूनच गेलाय, कधी घरातून जातोय, कधी घरी येतोय, कोणत्या गावाला जातोय? कुठे मदत करतोय हेसुद्धा बोलायला वेळ नाहीये. पण मला त्याचं कौतुक वाटतं. त्याच्या तो जबाबदाऱ्या ओळखून सर्वांसाठी मदतीला धावून जातोय, आमदार म्हणून नाही तर, वडील म्हणून चेहऱ्यावरती मुला विषयीचा अभिमान दिसून आला.माथाडी कामगार नेत्याचा मुलगा, आमदाराचा मुलगा असा ठपका लावणाऱ्यांना मी छातीठोकपणे सांगतो.

“सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष तेजस शशिकांत शिंदे आहेत.” आणि त्यांच्या कार्यातून समाज सेवेतून लवकरच तुम्हाला हे तेजस पर्व स्वतःचे कर्तुत्व, नेतृत्व, ताकद दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. होऊ घातलेल्या काळामध्ये तेजसदादा मोठ्या ताकतीने सातारा जिल्ह्यातील तळागाळातील युवकांना सोबत घेउन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून संघटना मजबुतीकरण युवा उद्योजक युवकांसाठी रोजगार युवकांसाठी शैक्षणिक स्तरावरतीच कार्य दादांच्या माध्यमातून उभे राहील.खरं लिखाण करण्यामागचे कारण तेवढेच होतं. सातारा जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी व त्यात झालेलं नुकसान, त्यामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली. अशावेळी युवा जिल्हाध्यक्ष तेजसदादांनी जो मदतीचा यज्ञ सुरू केला व सातारा जिल्ह्यातील डोंगर वाड्या-वस्त्यांवर जाऊन सर्वांच्या गाठीभेटी घेऊन विचारपूस करून प्रेमाने धीर दिला. अंत:करणापासून त्यांची विचारपूस केली. मदतीचा आधार दिला. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी लागेल ती मदत, वाट्टेल तेवढे पैसे, स्वखर्चाने घालवून लोकांसाठी ते धावून गेले. पूरग्रस्त कुटुंबियातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालन-पोषणसुद्धा दादा या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन करतील. जेणेकरून, भविष्यात शैक्षणिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्यांची शैक्षणिक जबाबदारी दादा स्वतः पार पडतील.

विदेशात एम.बी.ए. शिक्षण घेऊन आलेल पोरगं, माथाडी कामगाराच्या नेत्याचं लाडात वाढलेल पोरगं, सर्व सुखसुविधा पायाशी लोटांगण घालत असताना, कोणतीतरी मोठी कंपनी काढून व्यवसाय करण्यापेक्षा, “सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होऊन सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करणारे तेजसदादा यांची खरी गरज सर्वसामान्य जनतेला आहे ते सांगताना मला खरंच खूप अभिमान वाटत आहे. अशा माझ्या भावासाठी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की, त्यांच्या हातून अशीच जनसेवा, जनकार्य, समाजहिताचं कार्य घडू देत एवढीच हात जोडून मनःपूर्वक प्रार्थना.

“आधी केले मग सांगितले”, या उक्ती प्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष मा. तेजस दादा शिंदे …! आपणा सर्वांचे दैवत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय सातारा येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या माध्यमातून रक्तदान शिबीरे आयोजित केली जात आहेत. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे रक्तदान शिबीर आयोजित केले जात आहे. रक्तदान करा, असे आवाहन अनेकजण करतात. मात्र, मी रक्तदान केले आहे, आपणही करा हे स्वतःच्या कृतीतुन दर्शविणारा युवा तरुण तडफदार नेता म्हणजे तेजसदादा शिंदे. कोरोना महामारीमध्ये रक्तदान म्हणजेच जीवनदान. आत्ता वाढत असलेली संख्या पाहता रक्तदान करणं खूप गरजेचं आहे. या परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णाला रक्त नाही म्हणून आपला जीव गमवावा लागेल, याची जाणीव ठेवून आत्ता रक्तदान करणं खूप महत्त्वाच आहे. आपण दिलेल्या रक्तदानाने एखाद्याचा जीव आपण वाचवू शकतो, म्हणूनच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष तेजसदादांनी सर्वांना आवाहन केले, जेणेकरून अनेक युवक यात सक्रियरित्या सहभागी होतील. तेजसदादांच्या माध्यमातून असेच वेगवेगळे उपक्रम होवोत. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून सर्वसामान्य जनतेसाठी तेजस दादांचे कार्य अखंड चालू असते. विदेशातून उच्चशिक्षण घेऊन, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक कार्याचे ध्येय समोर ठेवून दादा वाटचाल करत आहेत. शांत, संयमी नेतृत्व, सर्वांशी आदराने व प्रेमाने वागणारे, माझे वडील आमदार आहेत, याचा कुठलाही मोठेपणा न करता सर्वसामान्य घरातील युवकांमध्ये राहून संघटना बांधणीचे काम दादा करतात. शिक्षण, वडिलांचे पद, पैसा याची कणभर देखील घमेंड दादांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. युवकांचा जिल्हाध्यक्ष कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तेजस दादा शिंदे. आपल्या हातून असेच सामाजिक कार्य घडो. एवढीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो व आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो.”एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष फक्त तेजस दादा…!”

“हमे नाम से नही, काम से पहचानते है लोग…!”सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणारे, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र सर्वसामान्य जनतेच्या जीवाची काळजी करणारे, सण वार, कोणताही ऋतू न बघणारे, स्वतःच्या बायका पोरांपेक्षा समाजासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करणारे, निस्वार्थीपणे सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे, माझे महाराष्ट्र पोलीस खऱ्या अर्थानं समाजसेवा करत आहेत आणि म्हणूनच आपण आपल्या समाज बांधवांसाठी ज्यांनी स्वतःच्या घरची पर्वा केली नाही, अशा पोलीस बांधवांसाठी सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष मा. तेजस दादा शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज कोरेगाव पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधवांसाठी मास्क, सॅनिटायझर, ग्लुकोनडी व बिसलेरीचे बॉक्स आज कोरेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष युवक विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांच्याहस्ते देण्यात आले. खाकी वर्दीमधला देव माणूस युवाच्या जिल्हाध्यक्षांनी जाणला व माणुसकी म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवून जिल्ह्यामध्ये सर्व युवा तालुका अध्यक्ष यांसाठी नवीन आदर्श नवीन पायंडा पाडलेला आहे. तेजस दादा यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी अशा पद्धतीचे उपक्रम राबून खाकीतील देव माणसांना वेगवेगळ्या पद्धतीचे सहकार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष माननीय तेजस दादा शशिकांत शिंदे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng