एल. आय. सी. क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा एम.डी.आर.टी. 2022 चा पुरस्कार श्री. परमेश्वर ननवरे यांना जाहीर.

पंढरपूर ( बारामती झटका )


एल आय सी या क्षेत्रात गेली अनेक वर्षे श्री परमेश्वर ननवरे हे काम करत आहेत. 2011 पासुन झोनल मॅनेजर क्लब मेंबर तर 2015 पासुन चेअरमन क्लब मेंबर म्हणुन ते काम करत होते. 2021 मध्ये त्यांनी एम डी आर डी आर टी या सर्वोच्च पुरस्काराचे टार्गेट पूर्ण करून या।अमेरिका येथे जुन 2022 मध्ये होणाऱ्या जागतिक स्तरावरील विमा सल्लागारांच्या महासंमेलनासाठी परमेश्वर ननवरे पात्र झाले आहेत. आंतराष्ट्रीय जागतिक स्तरावर हा पुरस्कार खुप थोड्या विमा प्रतिनिधींना मिळत असतो तोच बहुमान परमेश्वर ननवरे यांनी मिळवुन गौरव प्राप्त केला आहे. यासाठी विकास अधिकारी एच. एन. नामजोशी, पंढरपुर शाखाधिकारी बाळासाहेब डोईफोडे, विश्वजीत आगवेकर , व शाखेतील सर्व कर्मचारी असंख्य विमाधारक , विमा प्रतिनिधी व मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदादासाहेब वाघमोडे गटाच्या मनाच्या मोठेपणा मुळे भांबुर्डी गावच्या सरपंच पदाची संधी – महादेव वाघमोडे
Next articleडॉ.चारूदत्त वसंतराव रणदिवे यांची आयुष भारत महाराष्ट्र राज्य हिप्नोथेरेपी अध्यक्ष पदी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here