एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगार वाढ; ज्या कामगारांची सेवा 10 वर्षांची त्यांचा पगार 7 हजाराने वाढला.

मुंबई (बारामती झटका)

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर आज तोडगा निघाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषतद घेऊन एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याचं त्यांनी सांगितलं.

अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. डीए दिला जातो, तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचं आश्वासन दिलं होतं. करारात तसं होतं.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील नातेपुते माळशिरस महाळुंग सह राज्यातील नगरपंचायतीचे 21 डिसेंबरला मतदान.
Next articleसोयाबीन-कापूस उत्पादकांच्या बाबतीत अन्नत्याग आंदोलनकर्ते रविकांत तुपकर समवेत झाले महत्वाचे निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here