एसटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासंदर्भात सकारात्मक विचार करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक…

कुर्डूवाडी (बारामती झटका)

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्यानंतर आपल्या जीवाची बाजी लावत एसटीत भरती झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. या सर्व कर्मचाऱ्यांना एसटी सेवेत घेण्यासंदर्भात सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख मनीष काळजी, माढा तालुका प्रमुख शंभूराजे साठे या पदाधिकाऱ्यासमवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी प्रा. शिवाजी सावंत यांनी या एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी व व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियमाप्रमाणे मुलाखती घेऊन नेमणूक झाली आहे. एसटीच्या संप काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहेत, याविषयी निवेदन देण्यासाठी वर्षा निवासस्थानी जवळपास 200 कर्मचारी आले होते.

या सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article‘कार्य हीच ओळख’ फाउंडेशनचे विश्वस्त, निसर्गमित्र सागर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत…
Next articleफलटण तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here